मलाखी 3:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा म्हणजे मी आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढ्या आशीर्वादांचा तुमच्यावर वर्षाव करतो की नाही ह्याविषयी माझी प्रचिती पाहा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “माझ्या घरात अन्न असावे यासाठी तुम्ही संपूर्ण दशमांश कोठरांत आणा. आणि तुम्ही असे केले म्हणजे मी तुमच्यासाठी आकाशाच्या खिडक्या उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हावर ओतीन की नाही याविषयी माझी प्रचिती पाहा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तुमचा सर्व दशांश मंदिराच्या भांडारात आणा म्हणजे माझ्या भवनात पुरेसे अन्न राहील. याबाबत तुम्ही माझी परीक्षा घ्या,” सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. “आणि बघा तुमच्यासाठी मी स्वर्गाची धरणद्वारे उघडेन आणि तुमच्यावर आशीर्वादाचा एवढा वर्षाव करेन की ते साठविण्यास तुमच्याजवळ पुरेशी जागाही असणार नाही. Faic an caibideil |