Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मलाखी 2:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 ह्यास्तव मी तुम्हांला सर्व लोकांपुढे तुच्छ व नीच केले आहे, कारण तुम्ही माझ्या मार्गांनी चालत नाही व माणसांची भीड धरून न्याय करता.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 “ह्याबद्दल मी देखील तुला तिरस्कारणीय आणि सर्व लोकांसमोर नीच असे करीन. कारण तू माझे मार्ग पाळले नाहीत आणि नियमशास्त्र पाळण्यात पक्षपात केला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 “म्हणून सर्व लोकांच्या दृष्टीने मी तुम्हाला तिरस्करणीय व तुच्छ केले आहे; कारण तुम्ही स्वतः माझे मार्ग अनुसरले नाहीतच, पण कायद्याबाबत तुम्ही पक्षपात केला.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




मलाखी 2:9
30 Iomraidhean Croise  

मीखाया म्हणाला, “तू सुखरूप परत आलास तर समजावे की परमेश्वर माझ्या द्वारे बोललाच नाही.” तो म्हणाला, “लोकहो, तुम्ही सर्व हे ऐका.”


मी कोणाचा पक्ष धरणार नाही, कोणाची खुशामत करणार नाही.


नीतिमानांच्या स्मरणाने धन्यता वाटते; दुर्जनांचे नाव वाईट होऊन जाते.


मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेप्रमाणे होते, पण ज्याचे हृदय कुटिल असते त्याचा तिरस्कार होतो.


तुमच्या जाळ्याही मी फाडून टाकीन, तुमच्या हातातले माझे लोक मी सोडवीन; ते तुमच्या हाती ह्यापुढे भक्ष्य होणार नाहीत; तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.


नाशावर नाश येईल, अवईवर अवई उठेल; ते संदेष्ट्यांना दृष्टान्त पाहायला सांगतील, पण याजकांचे नियमशास्त्रज्ञान व वडिलांचे मसलत देण्याचे सामर्थ्य ही नष्ट होतील.


तिचे प्रमुख लाच खाऊन न्याय करतात, तिचे याजक वेतन घेऊन शिक्षण देतात, तिचे संदेष्टे पैसे घेऊन भविष्य सांगतात; तरी ते परमेश्वरावर अवलंबून म्हणतात की, “परमेश्वर आमच्या ठायी नाही काय? आमच्यावर काही अनिष्ट येणार नाही.”


तुझ्यावर हेंदर फेकून तुला तुच्छ करीन, तुला उपहासविषय करीन.


पाहा, मी तुमच्या शेतातले बी निर्जीव करीन,1 तुमच्या यज्ञपशूची विष्ठा तुमच्या मुखांना फाशीन; लोक विष्ठेबरोबर तुम्हांलाही फेकून देतील.


पण तुम्ही मार्ग सोडून गेला आहात, नियमशास्त्राच्या मार्गात पुष्कळांना तुम्ही ठोकर खायला लावले आहे; तुम्ही लेव्यांचा करार बिघडवला आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


परंतु स्वतःस नीतिमान ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, “पण माझा शेजारी कोण?”


परंतु तुम्हा परूश्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही पुदिना, सताप व प्रत्येक भाजी ह्यांचा दशांश देता, पण न्याय व देवाची प्रीती ह्यांकडे दुर्लक्ष करता; ह्या गोष्टी करायच्या होत्या, व त्या सोडायच्या नव्हत्या.


परंतु कोणीतरी प्रतिष्ठित म्हणून जे मानले जात होते, (ते कसेही असोत त्याचे मला काही नाही; माणसाला ‘देव तोंडावरून मानत नाही’) त्या प्रतिष्ठितांनी माझ्या सुवार्तेत काही भर घातली नाही,


न्याय करताना पक्षपात करू नका, लहानमोठ्यांचे सारखेच ऐकून घ्या; कोणाचे तोंड पाहून भिऊ नका; कारण न्याय करणे देवाचे काम आहे; एखादे प्रकरण तुम्हांला विशेष अवघड वाटले, तर ते माझ्याकडे घेऊन या, म्हणजे मी ते ऐकेन.’


ह्यास्तव इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालू राहील असे मी म्हटले होते खरे, पण आता परमेश्वर म्हणतो, असे माझ्या हातून न घडो; कारण जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan