मलाखी 2:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याच्या मुखात सत्याचे नियमशास्त्र होते, त्याच्या वाणीत कुटिलता आढळली नाही; तो माझ्याबरोबर शांतीने व सरळतेने वागला, व त्याने अनेकांना अधर्मापासून वळवले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 खरे शिक्षण त्याच्या मुखात होते आणि त्याच्या ओठांत अनीती आढळली नव्हती. शांतीने आणि सरळपणाने तो माझ्यात चालला, आणि त्याने अन्यायापासून पुष्कळांना फिरवले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 सत्याचे शिक्षण त्याच्या मुखात होते व त्याच्या जिभेवर काहीही असत्य असे नव्हते. तो माझ्यासह शांती व नीतिमत्तेत चालला आणि त्याने अनेकांना त्यांच्या पापी जीवनापासून वळविले. Faic an caibideil |