Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मलाखी 2:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 लेव्यांबरोबर माझा करार कायम होण्यासाठी ही आज्ञा मी तुमच्याकडे पाठवली आहे हे तुम्हांला समजेल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 आणि तेव्हा तुम्हास कळेल की, माझा करार लेवी बरोबर असावा ह्यास्तव मी या आज्ञा तुम्हाकडे पाठवल्या आहेत,” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 आणि मग तुम्हाला समजेल की मी तुम्हाला हा सावधानतेचा इशारा दिला आहे, जेणेकरून लेवी वंशाशी माझा करार कायम राहील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मलाखी 2:4
21 Iomraidhean Croise  

मीखाया त्याला म्हणाला, “तू लपण्यासाठी घराच्या आतल्या कोठडीत पळून जाशील तेव्हा तुला कळेल.”


हे माझ्या देवा, त्यांनी याजकपद भ्रष्ट केले आहे आणि याजकवृत्तीचा व लेवीवृत्तीचा करार मोडला आहे, म्हणून त्यांची आठवण ठेव.


हे परमेश्वरा, तुझा हात वर झाला तरी त्यांनी पाहिले नाही. लोकांविषयीची तुझी आस्था पाहून ते फजीत होतील; अग्नी तुझ्या शत्रूंना ग्रासील.


अशा रीतीने याकोबाच्या दोषांचे क्षालन होईल; त्याचे पाप दूर केल्याचे फळ हेच आहे; तो वेद्यांचे सर्व चिरे फुटलेल्या चुनखड्यासारखे करील तेव्हा अशेरामूर्ती व सूर्यमूर्ती पुन्हा उभारणार नाहीत.


कोणी संदेष्टा शांतीचा संदेश देतो तेव्हा त्या संदेष्ट्याचे वचन प्रत्ययास आले म्हणजे समजावे की खरोखर परमेश्वराने त्याला पाठवले आहे.”


तरीपण हे घडून येईल, (पाहा, ते आता घडत आहे,) तेव्हा आपल्यात एक संदेष्टा होता, असे त्यांना समजून येईल.”


ह्या प्रकारे मी आपला महिमा व पवित्रता प्रकट करीन, आणि बहुत राष्ट्रांना माझी प्रत्यक्ष ओळख होईल; तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.


तुम्ही मला अन्न, चरबी व रक्त अर्पण करताना मनाने व शरीरानेही बेसुंती अशा परक्या लोकांना माझ्या पवित्रस्थानात आणून माझे मंदिर भ्रष्ट केले आहे. ह्याप्रमाणे तुम्ही माझा करार मोडून आपल्या सर्व अमंगळ कृत्यांमध्ये भर घातली आहे.


पाहा, माझ्यापुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवतो; ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल; पाहा, करार घेऊन येणार्‍या निरोप्याची3 तुम्ही अपेक्षा करत आहात, तो येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


लेवीचा वंश म्हणजे तुझ्या पूर्वजांच्या वंशातील तुझ्या बांधवांनी तुझ्याबरोबर तुझ्या हाताखाली सेवा करावी, म्हणून त्यांनाही आपल्याबरोबर घे; पण साक्षपटाच्या तंबूपुढे तू व तुझ्याबरोबर तुझे मुलगे ह्यांनीच राहावे.


“लेवीचे वंशज दर्शनमंडपाची जी सेवा करतात तिच्याबद्दल इस्राएल लोकांकडून जे सगळे दशमांश येतात तेच वतन म्हणून त्यांना मी नेमून दिले आहेत.


म्हणून त्याला असे सांग की, मी त्याच्याशी आपला शांतीचा करार करतो.


परमेश्वराने मोशेला सांगितले की,


“इस्राएलातल्या सर्व प्रथमजन्मलेल्यांच्या ऐवजी मी इस्राएल लोकांतून लेवी वंश घेतला आहे; लेवी वंशातील लोक माझेच आहेत;


“इस्राएलांच्या सर्व प्रथमजन्मलेल्यांच्या ऐवजी लेवी वंश आणि त्यांच्या पशूंच्या ऐवजी लेव्यांचे पशू घे; लेवी वंशातील लोक माझे आहेत; मी परमेश्वर आहे.


त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील; पण भूस न विझत्या अग्नीने जाळून टाकील.”


‘आमच्या पायांना लागलेली तुमच्या गावची धूळदेखील तुमची तुम्हांला झाडून टाकतो; तथापि हे लक्षात ठेवा की, देवाचे राज्य जवळ आले आहे.’


माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो; आणि फळ देणार्‍या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan