Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मलाखी 2:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 पाहा, मी तुमच्या शेतातले बी निर्जीव करीन,1 तुमच्या यज्ञपशूची विष्ठा तुमच्या मुखांना फाशीन; लोक विष्ठेबरोबर तुम्हांलाही फेकून देतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 पाहा! मी तुमच्या वंशजांना शिक्षा करीन आणि तुमच्या यज्ञपशूंचे शेण मी तुमच्या तोंडावर फाशीन, आणि त्याबरोबर तुम्हासही फेकून देण्यात येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 “हे लक्षात ठेवा की मी तुमच्या मुलांना धमकावेन आणि तुम्ही मला सणासाठी अर्पण म्हणून आणलेल्या पशूंची विष्ठा मी तुमच्या मुखांना फाशीन आणि तुम्हाला तसेच जाऊ देईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मलाखी 2:3
16 Iomraidhean Croise  

ह्यास्तव, पाहा, मी यराबामाच्या घराण्यावर अरिष्ट आणीन, यराबामाच्या घराण्यातल्या प्रत्येक पुरुषाचा मी उच्छेद करीन, मग तो इस्राएलाच्या बंदीत असो की मोकळा असो; ज्याप्रमाणे शेण अगदी साफ निघून जाईपर्यंत काढून टाकतात त्याप्रमाणे मी यराबामाचे घराणे काढून टाकीन.


तरी त्याच्या विष्ठेप्रमाणे त्याचा कायमचा नाश होईल; त्याला जे पाहत असत ते विचारतील, ‘तो कोठे गेला?’


जयघोष होत असता देव वर गेला आहे, कर्ण्याचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे.


ते एन-दोर येथे नाश पावले; ते शेताला खत झाले.


पण गोर्‍ह्याचे मांस, कातडे व शेण ही छावणीबाहेर नेऊन अग्नीने जाळून टाकावीत; हा पापार्पणाचा बली होय.


त्या ते सूर्य, चंद्र व आकाशातील सर्व नक्षत्रगण ह्यांपुढे पसरतील; त्यांची तर त्यांनी आवड धरली, त्यांची सेवा केली, त्यांच्यामागे ते चालले, त्यांचा त्यांनी धावा केला व त्यांचे भजनपूजन केले; त्या अस्थी गोळा करून पुरणार नाहीत, तर त्या भूतलावर खत होतील.


शेताचे रान झाले आहे; भूमी रुदन करत आहे, कारण पिकाचा नाश झाला आहे; नवा द्राक्षारस आटला आहे; तेल क्षय पावले आहे.


ढेकळांखाली धान्यास बुरा चढला आहे, पेवे रिकामी पडली आहेत; कोठारे पडून गेली आहेत; कारण पिके बुडाली आहेत.


तर मी तुमचे काय करीन ते ऐका : मी तुम्हांला घाबरे करीन, क्षयरोग व ताप ह्यांनी मी तुम्हांला पिडीन; त्यामुळे तुमचे डोळे क्षीण होतील व तुमचा जीव झुरणीस लागेल; तुम्ही बियाणे पेराल पण ते व्यर्थ जाईल, कारण त्याचे उत्पन्न तुमचे शत्रू खाऊन टाकतील.


तुझ्यावर हेंदर फेकून तुला तुच्छ करीन, तुला उपहासविषय करीन.


ह्यास्तव मी तुम्हांला सर्व लोकांपुढे तुच्छ व नीच केले आहे, कारण तुम्ही माझ्या मार्गांनी चालत नाही व माणसांची भीड धरून न्याय करता.”


ते जमिनीला किंवा उकिरड्यालाही उपयोगी नाही; ते बाहेर टाकून देतात. ज्याला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.”


आमची निंदा होत असता आम्ही मनधरणी करतो; आम्ही जगाचा गाळ, सर्वांची खरवड असे आजपर्यंत झालो आहोत.


तू शेतात पुष्कळ बी घेऊन जाशील, पण थोडेच पीक गोळा करशील, कारण टोळ ते खाऊन टाकतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan