Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मलाखी 2:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तुम्ही आपल्या भाषणाने परमेश्वराला कंटाळा आणला आहे, तरी तुम्ही म्हणता, ‘आम्ही कशाने त्याला कंटाळा आणला?’ तुम्ही म्हणता, ‘प्रत्येक दुष्कर्मी इसम परमेश्वराच्या दृष्टीने चांगला आहे व तो त्याच्यासंबंधाने संतुष्ट असतो, नाहीतर न्याय करणारा देव आहे कुठे?’ अशाने तुम्ही त्याला कंटाळा आणला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 तुम्ही आपल्या शब्दांनी परमेश्वरास कंटाळविले आहे. परंतु तुम्ही म्हणता, त्यास आम्ही कशाने कंटाळविले आहे? तुम्ही म्हणता प्रत्येक दुष्कर्मी परमेश्वराच्या दृष्टीत चांगला आहे, आणि त्यास त्याच्यात आनंद आहे. किंवा न्यायी देव कोठे आहे? असे म्हणून तुम्ही त्यास कंटाळविले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 तुम्ही आपल्या शब्दांनी याहवेहला त्रागा आणला आहे. पण तुम्ही विचारता, “आम्ही याहवेहला त्रागा कसा आणला?” असे म्हणूनच, “जे सर्व लोक दुष्टता करतात, ते याहवेहच्या दृष्टीने चांगले आहेत व ते त्यांच्यावर प्रसन्न आहेत, मग न्यायी परमेश्वर कुठे आहेत?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




मलाखी 2:17
34 Iomraidhean Croise  

जो न्यायाचा वैरी तो शास्ता होईल काय? जो न्यायी, जो समर्थ, त्याला तू दोषी ठरवशील काय?


शेवटपर्यंत ईयोबाची कसोटी पाहावी हे बरे; कारण दुष्टाप्रमाणे त्याने उत्तरे दिली आहेत.


तू दुष्टांसारखा दोषारोप करीत राहशील; तर दोषारोप व न्यायदंड ह्यांच्या तावडीत तू सापडशील.


पृथ्वी दुष्टाच्या हाती दिली आहे, देव तिच्या शास्त्यांची मुखे झाकतो; ही त्याची करणी नव्हे तर दुसर्‍या कोणाची?


दुष्कर्माबद्दल शिक्षा तत्काळ होत नाही म्हणून मानवपुत्रांचे मन दुष्कर्म करण्याकडे प्रवृत्त होते.


माझा जीव तुमची चंद्रदर्शने व सण ह्यांचा द्वेष करतो; त्यांचा मला भार झाला आहे; तो सोसून मी थकलो आहे.


जे परमेश्वरापासून आपले मनसुबे लपवतात, आपला कारभार अंधारात चालवतात आणि “आम्हांला कोण पाहतो, आमचे कोणाला कळते,” असे म्हणतात, त्यांना धिक्कार असो;


ह्यामुळे परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होण्यास विलंब लावील; तुमच्यावर करुणा करावी म्हणून उच्च स्थानी आरूढ होईल. परमेश्वर न्यायी देव आहे; जे त्याची वाट पाहतात ते सर्व धन्य.


हे याकोबा, तू तर माझा धावा केला नाहीस; हे इस्राएला, माझा तुला कंटाळा आला.


तू पैसे देऊन माझ्यासाठी अगरू विकत घेतला नाहीस, आपल्या यज्ञबलीच्या वपेने तू मला तृप्त केले नाहीस; तर तू आपल्या पातकांची माझ्यावर सक्ती केलीस, तू आपल्या दुष्कर्मांनी मला शिणवलेस.


तेव्हा तो म्हणाला, “हे दाविदाच्या घराण्या, मी सांगतो ते ऐक : तुम्ही मनुष्याला कंटाळा आणता हे थोडे झाले म्हणून माझ्या देवालाही कंटाळवता काय?


हे परमेश्वरा, मी तुझ्याशी वाद घालू लागलो तर तू न्यायीच ठरशील; तरी मी तुझ्याशी असा वाद करतो की दुष्टांचा मार्ग का सफल होतो? बेइमानी करणार्‍या सर्वांना सुखसमाधान का प्राप्त होते?


परमेश्वर म्हणतो, तू माझा त्याग केला आहेस; तू मागे फिरली आहेस, म्हणून मी आपला हात तुझ्यावर उगारून तुझा नाश करीन; मी अनुताप करून कंटाळलो आहे.


पाहा, ते मला म्हणतात, “परमेश्वराचे वचन कोठे आहे? ते पुढे येऊ द्या!”


तुमच्या कर्माचा दुष्टपणा व तुम्ही केलेली घोर कर्मे ही परमेश्वराला इतःपर सहन होईनात; म्हणूनच तुमचा देश ओसाड, वैराण, शापग्रस्त व निर्जन झाला आहे, हे आज दिसतच आहे.


तू आपल्या तरुणपणाच्या दिवसांचे स्मरण ठेवले नाहीस, तर हे सर्व करून मला चिडवलेस, म्हणून पाहा, प्रभू परमेश्वर म्हणतो, तुझ्या अनाचाराचे प्रतिफळ मी तुझ्या माथी लादीन, म्हणजे आपल्या इतर सर्व अमंगळ कर्मांत आणखी शिंदळकीची भर तू घालणार नाहीस.


तरी तुम्ही म्हणता, ‘प्रभूचा मार्ग न्याय्य नाही.’ हे इस्राएल घराण्या, ऐक; माझा मार्ग न्याय्य नाही काय? तुमचेच मार्ग न्याय्य नाहीत, असे नव्हे काय?


तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएल घराण्याचा प्रत्येक वडील आपल्या मूर्तिगृहात अंधारामध्ये काय करीत आहे हे तुला दिसते ना? ते तर म्हणतात की, ‘परमेश्वर आम्हांला पाहत नाही; परमेश्वराने देशाचा त्याग केला आहे.”’


तेव्हा तो मला म्हणाला, “इस्राएल व यहूदा ह्यांच्या घराण्याचा अधर्म अत्यंत भारी आहे; देश रक्तपाताने भरला आहे; कारण ते म्हणतात, ‘परमेश्वराने देशाचा त्याग केला आहे, परमेश्वर पाहत नाही.’


ह्यामुळे पाहा, धान्याच्या पेंढ्यांनी गच्च भरलेला गाडा जसा खाली दबतो तसे मी तुम्हांला दाबीन.


त्या समयी असे होईल की मी दिवट्या घेऊन यरुशलेमेची तपासणी करीन; व जे खाली गाळ असलेल्या द्राक्षारसासारखे मंदावले आहेत आणि आपल्या मनात म्हणतात की, ‘परमेश्वर बरे करत नाही व वाईटही करत नाही,’ त्यांचा मी समाचार घेईन.


तुम्ही म्हणता “असे का?” कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीमध्ये परमेश्वर साक्षी आहे; ती तर तुझी सहचारिणी व तुझी कराराची पत्नी असून तिच्याबरोबर तू विश्वासघाताने वागला आहेस.


मनुष्य देवाला ठकवील काय? तुम्ही तर मला ठकवले आहे; असे असून तुम्ही म्हणता, ‘आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवले आहे?’ दशमांश व अर्पणे ह्यासंबंधाने.


तो दुर्ग आहे; त्याची कृती परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्वसनीय देव आहे, त्याच्या ठायी अनीती नाही; तो न्यायी व सरळ आहे.


गर्वाने एवढे फुगून आता बोलू नका, तुमच्या मुखातून उन्मत्तपणाचे भाषण न निघो; कारण परमेश्वर ज्ञाता देव आहे; तो सर्व कृती तोलून पाहतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan