Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मलाखी 2:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 ज्याच्या ठायी आत्म्याचा थोडातरी अंश आहे अशा कोणीही असे कधी केले नाही; देवाला अनुसरणार्‍या संततीची इच्छा करणारा कोणी आहे काय? ह्याकरता आपल्या आत्म्याला जपावे; व आपल्या तरुणपणाच्या पत्नीचा कोणी विश्वासघात करू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 आणि त्याच्या जवळ आत्म्याचे शेष होते तरी त्याने एक केले नाही काय? आणि त्याने तुम्हास एक का केले? कारण तो ईश्वरीय संततीची आशा बाळगत होता. म्हणून तुम्ही आपल्या आत्म्याचे रक्षण करा, आणि कोणीही आपल्या तरूणपणाच्या पत्नी सोबत विश्वासघात करू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 तुम्हाला एकाच परमेश्वराने निर्माण केले नाही का? तुमचे शरीर व आत्मा त्यांचाच मालकीचे आहे. आणि एका परमेश्वरास काय हवे असते? धार्मिक संतती. म्हणून सावध राहा, आपल्या तारुण्यातील पत्नीचा विश्वासघात करू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मलाखी 2:15
39 Iomraidhean Croise  

देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली.


मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यांत जीवनाचा श्वास फुंकला; तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला.


आणि ती मला म्हणेल, “तू पी व मी तुझ्या उंटांसाठीही पाणी काढते,” तीच स्त्री परमेश्वराने माझ्या धन्याच्या मुलासाठी नेमलेली आहे असे ठरो.


तेव्हा रिबका इसहाकाला म्हणाली, “ह्या हेथींच्या मुलींमुळे माझा जीव मला नकोसा झाला आहे; ह्यांच्यासारखी हेथींच्या मुलींतली, ह्या देशाच्या मुलींतली एखादी बायको याकोबाने करून घेतली तर मला जगून काय लाभ?”


तेव्हा मानवकन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले; आणि त्यांच्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या.


मग बंदिवासातून आलेल्या लोकांच्या पातकांसंबंधाने देवाचे वचन ऐकून ज्या लोकांचा थरकाप झाला, ते सगळे माझ्याजवळ जमा झाले, व मी संध्याकाळच्या अर्पणसमयापर्यंत चिंताक्रांत होऊन बसलो.


त्यांची मुलेबाळे अर्धवट अश्दोदी भाषा बोलत, त्यांना यहूदी भाषा बोलता येत नसे, ते आपापल्या जातींची मिश्र भाषा बोलत.


(अद्यापि माझा श्वासोच्छ्वास बरोबर चालत आहे, देवाने घातलेला श्वास माझ्या नाकपुड्यांत आहे;)


व्यभिचार करू नकोस


तिने आपल्या तरुणपणाचा मित्र सोडला आहे, ती आपल्या देवाचा करार विसरली आहे;


सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंत:करणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे.


तू आपले चित्त तिच्या सौंदर्यास पाहून लोलुप होऊ देऊ नकोस; तिच्या नेत्रकटाक्षांना वश होऊ नकोस.


तुझ्या मनाला तिच्या मार्गाकडे वळू देऊ नकोस, तिच्या वाटांनी जाऊन बहकू नकोस.


तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल; आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल.


मी तर तुला उत्कृष्ट जातीची उत्तम द्राक्षलता अशी लावली, ती तू माझ्यासमोर विजातीय हीन जातीची द्राक्षलता अशी कशी झालीस?


तथापि इस्राएलाची संतती समुद्राच्या वाळूसारखी संख्येने अपरिमित व अगण्य होईल आणि असे घडून येईल की, ‘तुम्ही माझे लोक नव्हत’ असे जेथे त्यांना म्हणत, तेथे ‘तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात,’ असे त्यांना म्हणतील.


जो दुसर्‍याच्या बायकोशी व्यभिचार करतो, म्हणजे आपल्या शेजार्‍याच्या बायकोशी व्यभिचार करतो त्या जाराला व त्या जारिणीला अवश्य जिवे मारावे.


तुम्ही म्हणता “असे का?” कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीमध्ये परमेश्वर साक्षी आहे; ती तर तुझी सहचारिणी व तुझी कराराची पत्नी असून तिच्याबरोबर तू विश्वासघाताने वागला आहेस.


कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोर्‍या, खोट्या साक्षी, शिवीगाळी ही निघतात.


असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि त्यांना म्हटले, “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा.


तुम्ही संदेष्ट्यांचे पुत्र आहात, आणि ‘तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील’ असे अब्राहामाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजांबरोबर केलेल्या कराराचेही तुम्ही पुत्र आहात.


कारण पत्नीच्या द्वारे ख्रिस्तीतर पती पवित्र झाला आहे आणि ख्रिस्ती पतीच्या द्वारे ख्रिस्तीतर पत्नी पवित्र झाली आहे; असे नसते तर तुमची मुलेबाळे अशुद्ध असती; परंतु आता ती पवित्र आहेत.


तरी जारकर्मे होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वत:ची पत्नी असावी, आणि प्रत्येक स्त्रीला स्वत:चा पती असावा.


आणि मी तुम्हांला ‘पिता असा होईन,’ तुम्ही ‘मला पुत्र’ व कन्या असे व्हाल, ‘असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.”


बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.


कारण ते लोक तुझ्या मुलाला माझ्यापासून बहकवतील; आणि अन्य देवांची सेवा करायला लावतील. त्यामुळे तुमच्यावर परमेश्वराचा कोप भडकेल व तो तात्काळ तुमचा नाश करील.


ज्याला नेमायचे तो निर्दोष, एका स्त्रीचा पती असावा; त्याची मुले विश्वास ठेवणारी असावीत. त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावीत.


आणि तामारेच्या पोटी यहूदापासून झालेल्या पेरेसाच्या घराण्यासारखे तुझे घराणे ह्या नववधूच्या पोटी परमेश्वर जे संतान देईल त्याच्या योगे होवो.”


एलीने एलकाना व त्याची स्त्री ह्यांना असा आशीर्वाद दिला की, “तुम्ही मागून घेतलेला परमेश्वराच्या स्वाधीन केला त्याबद्दल परमेश्वर तुला ह्या स्त्रीपासून संतती देवो.” मग ती उभयता आपल्या घरी गेली;


Lean sinn:

Sanasan


Sanasan