Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मलाखी 2:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 तुम्ही म्हणता “असे का?” कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीमध्ये परमेश्वर साक्षी आहे; ती तर तुझी सहचारिणी व तुझी कराराची पत्नी असून तिच्याबरोबर तू विश्वासघाताने वागला आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 तुम्ही म्हणता, “असे का नाही?” कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारूण्यातल्या स्त्रीमध्ये परमेश्वर साक्षीदार आहे. ती तर तुझी सहचारिणी असून व तुझ्या कराराची पत्नी असून तिच्याशी तू विश्वासघाताने वागला आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 तुम्ही विचारता, “का?” कारण याहवेह तुम्ही व तुमच्या तारुण्यातील पत्नी मधील साक्षीदार आहेत. ती तुमची सहचारिणी आहे व तुमच्या वैवाहिक कराराद्वारे तुमची पत्नी आहे, तरीही तुम्ही तिचा विश्वासघात केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मलाखी 2:14
22 Iomraidhean Croise  

मग परमेश्वर देव बोलला, “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही; तर त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करीन.”


तू माझ्या मुलींना दु:ख दिले किंवा त्यांखेरीज अन्य स्त्रिया केल्यास तर पाहा; तुझ्यामाझ्यामध्ये कोणी मानव नसला तरी देव साक्षी आहे.”


तिने आपल्या तरुणपणाचा मित्र सोडला आहे, ती आपल्या देवाचा करार विसरली आहे;


जारिणीचा रिवाज असा असतो : ती खाऊनपिऊन तोंड पुसते, आणि म्हणते, “मी काही दुष्कर्म केले नाही.”


माझ्या मुला, परस्त्रीने तुझे चित्त का मोहित व्हावेस? परक्या स्त्रीला तू का आलिंगन द्यावे?


देवाने ह्या भूतलावर तुझ्या व्यर्थ आयुष्याचे जे दिवस नेमले आहेत ते तुझे सर्व व्यर्थ दिवस आपल्या प्रिय स्त्रीबरोबर सुखाने घालव. आयुष्यात हा तुझा वाटा आहे; ह्या भूतलावर जे परिश्रम तू करतोस त्यांचे हे फळ तुला आहे.


माझ्या सखे, तू सुंदर आहेस; अगे, तू सुंदर आहेस! तुझे नेत्र कपोतांसारखे आहेत.


सोडलेल्या व दुःखित मनाच्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावत आहे, तरुणपणी टाकलेल्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावत आहे, असे तुझा देव म्हणतो.


‘आम्ही उपास करतो ते तू का पाहत नाहीस? आम्ही आपल्या जिवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस?’ “पाहा, आपल्या उपासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालवता, तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाडकष्ट करवता.


कारण त्यांनी इस्राएलात मूर्खपणा केला आहे, त्यांनी आपल्या शेजार्‍यांच्या बायकांबरोबर जारकर्म केले आहे, मी त्यांना आज्ञापली नाहीत अशी खोटी वचने त्यांनी माझे नाम घेऊन सांगितली; मी तर हे जाणतो व मी साक्षी आहे, असे परमेश्वर म्हणतो.”’


ते यिर्मयाला म्हणाले, “परमेश्वर आपला देव आपल्या हस्ते जे वचन आम्हांला सांगून पाठवील त्या सर्वांप्रमाणे आम्ही न केले तर परमेश्वर आमच्याविरुद्ध खरा विश्वसनीय साक्षी असो.


त्यांनी अमंगळ कृत्य केले त्याची त्यांना लाज वाटली काय? नाही; त्यांना बिलकूल लाज वाटली नाही; शरम कसली ती त्यांना ठाऊक नाही; म्हणून पतन पावणार्‍यांबरोबर ते पतन पावतील; मी त्यांचा समाचार घेईन तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील, असे परमेश्वर म्हणतो.


मला वनात वाटसरूंसारखे बिर्‍हाड असते तर किती बरे होते? म्हणजे मी आपल्या लोकांचा त्याग केला असता, त्यांच्यापासून निघून गेलो असतो; कारण ते सर्व व्यभिचारी, बेइमान्यांचा जमाव आहेत.


मग तुझ्याजवळून जाताना मी तुला पाहिले, तर ती वेळ तुझ्या प्रेमविकासाची होती; तेव्हा मी तुझ्यावर पदर घालून तुझी नग्नता झाकली. प्रभू परमेश्वर म्हणतो, तेव्हा मी शपथ वाहून तुझ्याबरोबर करार केला व तू माझी झालीस.


सर्व राष्ट्रांनो, तुम्ही ऐका; अगे पृथ्वी तू व तुझ्यावरील सर्व वस्तुजात ह्यांनी कान द्यावा; प्रभू परमेश्वर, आपल्या पवित्र मंदिरातून प्रभू, तुमच्याविरुद्ध साक्ष देतो,


ज्याच्या ठायी आत्म्याचा थोडातरी अंश आहे अशा कोणीही असे कधी केले नाही; देवाला अनुसरणार्‍या संततीची इच्छा करणारा कोणी आहे काय? ह्याकरता आपल्या आत्म्याला जपावे; व आपल्या तरुणपणाच्या पत्नीचा कोणी विश्वासघात करू नये.


मी न्याय करायला तुमच्याकडे येईन; आणि जादूगार, व्यभिचारी, खोटे साक्षी ह्यांच्याविरुद्ध आणि मजुरांची मजुरी अडकवून ठेवणारे, विधवा व अनाथ ह्यांच्यावर जुलूम करणारे, आणि मला न भिता परक्याला न्याय मिळू न देणारे ह्यांच्याविरुद्ध साक्ष देण्याची मी त्वरा करीन.


मनुष्य देवाला ठकवील काय? तुम्ही तर मला ठकवले आहे; असे असून तुम्ही म्हणता, ‘आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवले आहे?’ दशमांश व अर्पणे ह्यासंबंधाने.


गिलादाचे वडील जन इफ्ताहाला म्हणाले, “परमेश्वर तुमच्या-आमच्यामध्ये साक्षी आहे; तुम्ही म्हणता तसे आम्ही अवश्य करू.”


तो त्यांना म्हणाला, “माझ्या हाती तुम्हांला काही सापडले नाही ह्याबद्दल आज परमेश्वर तुमच्यासंबंधाने साक्षी आहे, व त्याचा अभिषिक्तही आज साक्षी आहे.” ते म्हणाले, “होय, तो साक्षी आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan