Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मलाखी 2:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 यहूदा विश्वासघात करत आहे, इस्राएलमध्ये व यरुशलेमेत एक अमंगळ प्रकार घडला आहे; म्हणजे यहूदाने परमेश्वराला प्रिय असलेले त्याचे पवित्रस्थान भ्रष्ट केले आहे, व परक्या दैवताच्या कन्येबरोबर विवाह केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 यहूदाने विश्वासघात केला आणि यरूशलेम व इस्राएलमध्ये तिरस्कारणीय गोष्टी केल्या आहेत. यहूदाने परमेश्वरास प्रिय असलेले पवित्र स्थान विटाळवीले आणि परक्या देवाच्या कन्येशी लग्न केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 यहूदाहने विश्वासघात केला. इस्राएल आणि यरुशलेम येथे अत्यंत घृणास्पद कार्य केले आहे: यहूदीयाच्या पुरुषांनी याहवेहचे प्रिय मंदिर परकीय मूर्तिपूजक स्त्रियांशी विवाह करून भ्रष्ट केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मलाखी 2:11
27 Iomraidhean Croise  

तेव्हा एलाम वंशातला शखन्या बिन यहीएल एज्राला म्हणाला, “आमच्या लोकांनी ह्या देशातील लोकांच्या अन्य जातींच्या स्त्रियांशी विवाह करून आपल्या देवाचा अपराध केला आहे; पण ह्या स्थितीतही इस्राएलासंबंधाने आशा आहे.


तर तुम्ही आपल्या कन्या त्यांच्या पुत्रांना देऊ नयेत; व त्यांच्या कन्या आपल्या पुत्रांना करू नयेत, त्यांचे क्षेमकुशल कधीही चिंतू नये, म्हणजे तुम्ही मजबूत होऊन त्या देशाचे उत्तम फळ चाखाल आणि आपल्यामागे आपल्या वंशजांना तो निरंतरचे वतन ठेवून जाल.’


ते पौर येथील बआल ह्या दैवतावर आसक्त झाले; त्यांनी निर्जीव मूर्तींना वाहिलेले बळी खाल्ले.


इस्राएल परमेश्वराला पवित्र, त्याच्या उपजाचे प्रथमफळ असा होता; त्याला गिळून टाकणारे सर्व दोषी ठरले. त्यांच्यावर अरिष्ट आले, असे परमेश्वर म्हणतो.”


इतके असूनही तिची बेइमान बहीण यहूदा मनापासून माझ्याकडे वळली नाही, तर कपटाने वळली, असे परमेश्वर म्हणतो.”


आणि मग येऊन ज्या मंदिराला मी आपले नाम दिले आहे त्यात माझ्यासमोर उभे राहता व आमची मुक्ती झाली आहे म्हणून ही सर्व अमंगळ कृत्ये करण्यास आम्हांला हरकत नाही, असे मनात म्हणता.


वाढीदिढी केली, व्याज घेतले, तर असला मनुष्य वाचेल काय? तो वाचायचा नाही; त्याने ही सर्व अमंगळ कृत्ये केली आहेत; तो खातरीने मरेल; त्याने केलेला रक्तपात त्याच्यावरच उलटेल.


तुझ्या ठायी कोणी आपल्या शेजार्‍याच्या स्त्रीबरोबर अघोर कर्म करतो, कोणी आपल्या सुनेबरोबर अगम्यगमन करून तिला भ्रष्ट करतो, कोणी आपल्या बहिणीला, आपल्या बापाच्या कन्येला भ्रष्ट करतो,


त्यांनी मनुष्याप्रमाणे1 करार मोडला आहे; तेथे ते माझ्याबरोबर बेइमानपणे वागले आहेत.


तुम्ही माझ्याप्रीत्यर्थ पवित्र व्हावे; कारण मी परमेश्वर पवित्र आहे; तुम्ही माझेच असावे म्हणून मी तुम्हांला इतर राष्ट्रांपासून वेगळे केले आहे.


मलाखीच्या द्वारे इस्राएलास प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन.


कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहात आणि परमेश्वराने भूतलावरील सर्व राष्ट्रांतून आपली खास प्रजा म्हणून तुम्हांला निवडून घेतले आहे.


परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, ‘खून करणारे,’ जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक, व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास ‘अग्नीचे व गंधकाचे’ सरोवर येईल; हेच ते दुसरे मरण आहे.”


ते त्यांच्या मुलींशी विवाह करू लागले, आपल्या मुली त्यांच्या मुलांना देऊ लागले आणि त्यांच्या देवांची सेवा करू लागले. कुशन-रिशाथईमच्या हातांतून अथनिएल इस्राएल लोकांना सोडवतो


Lean sinn:

Sanasan


Sanasan