Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मलाखी 1:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 परमेश्वर म्हणतो, “मी तुमच्यावर प्रीती केली. पण तुम्ही विचारता, तू कोणत्या बाबतीत आमच्यावर प्रीती केलीस?” परमेश्वर म्हणतो, “एसाव याकोबाचा भाऊ नव्हता काय? तरी मी याकोबावर प्रीती केली;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 परमेश्वर म्हणाला, “माझे तुमच्यावर प्रेम आहे.” पण तुम्ही म्हणालात, “कशावरून तू आमच्यावर प्रेम करतोस?” परमेश्वर म्हणाला, “एसाव याकोबचा भाऊ होता. बरोबर? पण मी याकोबला निवडले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 याहवेह म्हणतात, “मी तुमच्यावर नितांत प्रेम केले आहे.” पण यावर तुम्ही विचारता, “हे प्रेम तुम्ही कसे केले?” याहवेह जाहीर करतात, “एसाव याकोबाचा सख्खा भाऊ नव्हता काय? तरी देखील मी याकोबावर प्रीती केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मलाखी 1:2
32 Iomraidhean Croise  

परमेश्वर तिला म्हणाला, “तुझ्या गर्भाशयात दोन राष्ट्रे आहेत; तुझ्या उदरातून दोन वंश निघतील; एक वंश दुसर्‍या वंशाहून प्रबळ होईल; आणि वडील धाकट्याची सेवा करील.”


पहिला तांबूस वर्णाचा असून त्याचे सर्व अंग केशवस्त्रासारखे होते; त्याचे नाव एसाव ठेवले.


त्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला; एसावाची टाच त्याच्या हाती होती; आणि त्याचे नाव याकोब (टाच धरणारा किंवा युक्तीने हिरावून घेणारा) असे ठेवले. तिने त्यांना जन्म दिला तेव्हा इसहाक साठ वर्षांचा होता.


तेव्हा इसहाक अतिशय कंपायमान होऊन म्हणाला, “तर पारध करून आणलेल्या हरणाचे मांस घेऊन माझ्याकडे जो आला, आणि तू येण्यापूर्वी मी ते खाऊन ज्याला आशीर्वाद दिला तो कोण? तो आशीर्वादित होणारच.”


आणि म्हणाला, “पाहा, मी तुला फलद्रूप करून बहुगुणित करीन, तुझ्यापासून राष्ट्रसमुदाय उत्पन्न करीन आणि तुझ्यामागे तुझ्या संततीला हा देश निरंतरचे वतन करून देईन.


ज्याने आपणावर प्रसन्न होऊन आपणाला इस्राएलाच्या गादीवर स्थापले आहे तो आपला देव परमेश्वर धन्य होय; परमेश्वर इस्राएलांवर सर्वदा प्रेम करतो म्हणून न्यायाचे व नीतीचे पालन करण्यासाठी त्याने आपणाला राजा केले आहे.”


त्याने विचारले, “कोणत्या मार्गाने आपण जावे?” त्याने म्हटले, “अदोमी रानाच्या वाटेने.”


तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस; तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझ्यावर प्रेम करतो, म्हणून तुझ्याबद्दल माणसे व तुझ्या जिवाबद्दल राष्ट्रे मी देईन.


अदोमाहून येत आहे हा कोण? लालभडक वस्त्रे लेऊन बसराहून येत आहे हा कोण? आपल्या वस्त्राभरणांनी भूषित होऊन, आपल्या पराक्रमाच्या आढ्यतेने डुलत येत आहे हा कोण? “जो नीतीने बोलणारा, जो तारण करण्यास समर्थ तो मी आहे.”


अहो, ह्या पिढीचे लोकहो! तुम्ही परमेश्वराचे वचन लक्षात आणा; मी इस्राएलास वैराण, निबिड काळोखाचे स्थळ असा झालो आहे काय? ‘आम्ही मोकाट झालो आहोत, ह्यापुढे आम्ही तुझ्याकडे येणार नाही’, असे माझे लोक का म्हणतात?


परमेश्वर म्हणतो की, “तुमच्या पूर्वजांना माझ्या ठायी असा कोणता अन्याय आढळला की ते माझ्यापासून दूर गेले व शून्याच्या मागे लागून शून्यच झाले?


परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले; तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझ्यावर प्रेम करीत आलो म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे.


परमेश्वर म्हणतो, “अदोमाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; त्याने तलवार घेऊन आपल्या बंधूचा पाठलाग केला, त्याने आपला कळवळा दाबून टाकला, तो आपल्या क्रोधाने एकसारखा भडकत राहिला; त्याने आपला संताप सतत बाळगला.


तुम्ही आपल्या भाषणाने परमेश्वराला कंटाळा आणला आहे, तरी तुम्ही म्हणता, ‘आम्ही कशाने त्याला कंटाळा आणला?’ तुम्ही म्हणता, ‘प्रत्येक दुष्कर्मी इसम परमेश्वराच्या दृष्टीने चांगला आहे व तो त्याच्यासंबंधाने संतुष्ट असतो, नाहीतर न्याय करणारा देव आहे कुठे?’ अशाने तुम्ही त्याला कंटाळा आणला आहे.


परंतु स्वतःस नीतिमान ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, “पण माझा शेजारी कोण?”


जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे.


असे असूनही परमेश्वराला तुझे पूर्वज आवडले आणि त्याने त्यांच्यावर प्रीती केली म्हणून त्याने त्यांच्यामागे त्यांच्या संतानाला म्हणजे तुम्हांला, सर्व राष्ट्रांतून आजच्याप्रमाणे निवडून घेतले, हे आज विदितच आहे.


तरी तुझा देव परमेश्वर हा बलामाचे ऐकायला तयार झाला नाही; उलट तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्याकरता त्या शापाचा आशीर्वादच केला, कारण तुझा देव परमेश्वर ह्याची तुझ्यावर प्रीती होती.


तो आपल्या लोकांवर2 प्रीती करतो; त्याचे सर्व पवित्र जन तुझ्या हाती आहेत; ते तुझ्या पायाशी बसले आहेत; त्यांनी तुझी वचने ग्रहण केली आहेत.


त्याने तुझ्या पूर्वजांवर प्रीती केली म्हणून त्यांच्यामागून त्यांच्या संतानाला त्याने निवडून घेतले आणि स्वतः आपल्या महासामर्थ्याने त्याने तुला मिसर देशातून बाहेर आणले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan