Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मलाखी 1:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 ‘काय पीडा ही!’ असे म्हणून तुम्ही नाक मुरडता, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही लुटून आणलेला, लंगडा किंवा रोगी असा पशू आणून अर्पण करता; तुमच्या हातचे असले अर्पण मला पसंत होईल काय? असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तुम्ही असेही म्हणता की, हे किती कंटाळवाणे आहे, आणि त्याविषयी तुम्ही तुच्छतेने कुरकुर करता,” सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही जे जुलमाने लुटून आणलेले किंवा लंगडे किंवा रोगी या प्रकारचे तुमचे अर्पण आणता; तर आता हे मी तुमच्या हातातून स्वीकार करावे काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 ‘किती हे ओझे आहे!’ असे म्हणून तुम्ही त्याकडे घृणेने नाक मुरडता,” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात. “जेव्हा तुम्ही जखमी, लंगडे आणि आजारी पशू आणता व ते अर्पणे म्हणून वाहता, मी ते तुमच्या हातून स्वीकारावे काय?” याहवेह असे म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मलाखी 1:13
28 Iomraidhean Croise  

राजा अरवानाला म्हणाला, “नाही नाही, ह्या वस्तू तुझ्यापासून मी दाम देऊनच घेईन; मी आपला देव परमेश्वर ह्याला फुकटचे होमबली अर्पण करणार नाही.” मग दाविदाने पन्नास शेकेल चांदी देऊन ते खळे व बैल विकत घेतले.


तुम्ही माझे दर्शन घेण्यास येताना माझी अंगणे तुडवता, हे तुम्हांला सांगितले कोणी?


ओढ्यातले गुळगुळीत गोटे हाच तुझा वाटा; हाच तुझा भाग; त्यांनाच तू पेयार्पणे व अन्नार्पणे वाहिलीस. असल्या गोष्टी होत असता मला समाधान वाटेल काय?


“कारण मला, परमेश्वराला न्याय प्रिय आहे, अन्यायाच्या लुटीचा मला वीट आहे; मी त्यांना खातरीने प्रतिफळ देईन; त्यांच्याशी सार्वकालिक करार करीन.


तेव्हा मी म्हणालो, “अहा! प्रभू परमेश्वरा! पाहा, मी कधी विटाळलो नाही; मी लहानपणापासून आजवर कधी कोणत्याही आपोआप मेलेल्या किंवा पशूंनी फाडून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाल्ले नाही; अमंगळ मांस माझ्या तोंडास शिवले नाही.”


कोणताही आपोआप मेलेला किंवा फाडून टाकलेला प्राणी याजकांनी खाऊ नये; मग तो पक्षी असो किंवा पशू असो.


हे इस्राएला, जो मी तुझा साहाय्यकर्ता त्या माझ्यावर तू उलटलास, त्यामुळे तुझा नाश झाला.


मेलेले अथवा श्वापदांनी फाडलेले असे काही खाऊन त्याच्यामुळे अशुद्ध होऊ नये; मी परमेश्वर आहे.


म्हणजे असले पाप करून दोषी झाला तर त्याने लूट करून किंवा जुलूम करून जे घेतले असेल ते, किंवा आपल्याजवळची कोणाची ठेव बुडवली असेल ती, किंवा कोणाची हरवलेली वस्तू त्याला सापडली असून त्याने परत केली नसेल ती,


तुम्ही म्हणता, “चंद्रदर्शन कधी आटोपेल? म्हणजे आम्हांला धान्य विकता येईल; शब्बाथ केव्हा संपेल म्हणजे आम्ही गहू बाहेर काढू, एफा लहान करू, शेकेल मोठा करू व खोट्या तागडीने फसवू;


“हे माझ्या प्रजे, मी तुझे काय केले? मी तुला कशाने कंटाळवले? मला उत्तर दे.


तुम्ही माझ्या वेदीवर निरर्थक अग्नी पेटवू नये म्हणून तुमच्यातला कोणी दरवाजे बंद करील तर बरे! तुमच्यात मला मुळीच संतोष नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; तुमच्या हातचे यज्ञार्पण मी मान्य करून घेणार नाही.


जो मनुष्य असे करतो तो हाक मारणारा असो, उत्तर देणारा असो, किंवा सेनाधीश परमेश्वराला यज्ञार्पण करणारा असो, त्याला परमेश्वर याकोबाच्या डेर्‍यातून नाहीसे करील.


तसेच आसवे गाळणे, रडणे व उसासे टाकणे ह्यांनी परमेश्वराच्या वेदीला तुम्ही इतके झाकून टाकले आहे की तो यज्ञार्पणाकडे ढुंकून पाहत नाही; तुमच्या हातून ते आवडीने घेत नाही.


तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपास करत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपली तोंडे विरूप करतात. मी तुम्हांला खचीत सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत.


तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका; कारण लोकांनी आपणांस पाहावे म्हणून सभास्थानात व चवाठ्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हांला खचीत सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत.


पण त्यांतील एखाद्यात काही दोष असला, म्हणजे तो लंगडा किंवा आंधळा असला किंवा त्याच्यात दुसरे कोणतेही व्यंग असले तर त्याचे अर्पण तुझा देव परमेश्वर ह्याला करू नकोस.


माझ्या मंदिरात जी होमार्पणे व अन्नार्पणे अर्पण करण्याची मी आज्ञा दिली आहे त्यांना तुम्ही का लाथ मारता? आणि माझे इस्राएल लोक ह्यांनी केलेल्या अर्पणांपैकी सर्वोत्तम अर्पणे खाऊन तुम्ही लठ्ठ व्हावे म्हणून तू आपल्या पुत्रांचा माझ्याहून अधिक आदर का करीत आहेस?


Lean sinn:

Sanasan


Sanasan