Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मलाखी 1:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 कारण सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत राष्ट्रांमध्ये माझे नाव थोर आहे, माझ्या नावाप्रीत्यर्थ प्रत्येक स्थळी धूप जाळतात व निर्दोष बली अर्पण करतात; कारण माझे नाव राष्ट्रांमध्ये थोर आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 “कारण सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या मावळतीपर्यंत माझे नाव राष्ट्रांमध्ये थोर होईल; प्रत्येक ठिकाणी सर्व माझ्या नावाला धूप अर्पितील व शूद्ध अर्पण करतील. कारण माझे नाव राष्ट्रांमध्ये महान होईल.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 “जिथून सूर्य उगवतो व जिथे तो मावळतो तिथपर्यंतच्या सर्व राष्ट्रांमध्ये माझे नाम महान केले जाईल. प्रत्येक ठिकाणी माझ्या सन्मानार्थ सुवासिक धूप जाळण्यात येईल व शुद्ध अर्पणे वाहण्यात येतील, कारण माझे नाम सर्व राष्ट्रांमध्ये थोर होईल,” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मलाखी 1:11
65 Iomraidhean Croise  

कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे; सर्व दैवतांहून त्याचेच भय धरणे योग्य आहे.


त्याने आपल्या लोकांना उद्धारदान पाठवून दिले आहे; त्याने आपला करार सर्वकाळचा नेमला आहे. त्याचे नाव पवित्र व भययोग्य आहे.


सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे.


ते परमेश्वराच्या मार्गांविषयी गातील; कारण परमेश्वराचा महिमा थोर आहे.


माझी प्रार्थना तुझ्यासमोर धूपाप्रमाणे माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर होवो.


तुझ्या नावाचे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील असे मी करीन, म्हणजे लोक युगानुयुग तुझे उपकारस्मरण करतील.


हे देवा, जसे तुझे नाव, तशी तुझी कीर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत जात आहे; तुझा उजवा हात न्यायपूर्ण आहे;


तुझ्या न्यायकृत्यांमुळे सीयोन डोंगर आनंद पावो; यहूदाच्या कन्या उल्लासोत.


देवाधिदेव परमेश्वर बोलला आहे, त्याने सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत पृथ्वीला हाक मारली आहे.


तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजवली आहेस; तू तिला फार फलद्रूप करतोस; देवाची नदी जलपूर्ण आहे; भूमी तयार करून तू मनुष्यांना धान्य पुरवतोस.


ह्यासाठी की, पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा, तू सिद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रांना विदित व्हावे.


हे प्रभू, तू उत्पन्न केलेली सर्व राष्ट्रे येऊन तुझ्या पाया पडतील, तुझ्या नावाचा महिमा गातील.


परमेश्वराच्या नावाची थोरवी गा; अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या;


त्या दिवशी तुम्ही म्हणाल : “परमेश्वराचा धन्यवाद करा, त्याच्या नामाचा जयघोष करा, राष्ट्रांमध्ये त्याची कृत्ये विदित करा; त्याचे नाम थोर आहे अशी वाखाणणी करा.


परमेश्वरापुढे गायन करा कारण त्याची करणी प्रतापमय आहे; हे सर्व पृथ्वीवर विदित होवो.


त्या दिवशी परमेश्वर मिसर्‍यांना आपली ओळख देईल व मिसरी परमेश्वराला ओळखतील; ते यज्ञ व बली अर्पून त्याची उपासना करतील; ते परमेश्वराला नवस करतील व तो फेडतील.


पाहा, परमेश्वराचे नाम दुरून येत आहे, त्याचा क्रोध भडकला आहे, धुराचा लोट चढत आहे; त्याचे ओठ क्रोधाने स्फुरत आहेत, त्याची जिव्हा भस्म करणार्‍या अग्नीसारखी आहे;


येणेकरून सर्वांनी जाणावे की उगवतीपासून मावळतीपर्यंत माझ्यावेगळा कोणी नाही. मीच परमेश्वर, अन्य कोणी नाही.


कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे; सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे; त्याला सर्व पृथ्वीचा देव म्हणतात.


ते मावळतीपासून परमेश्वराच्या नामाचे भय बाळगतील, सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या प्रतापाचे भय बाळगतील; कारण शत्रू पाण्याच्या लोंढ्यासारखा येईल तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्याविरुद्ध झेंडा उभारील.


मी त्यांची कृत्ये व त्यांचे विचार जाणतो; सर्व राष्ट्रांनी व भिन्नभिन्न भाषा बोलणार्‍यांनी माझे वैभव पाहावे म्हणून मी त्यांना एकत्र करावे अशी वेळ आली आहे.


हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोणीच नाही; तू थोर आहेस, पराक्रमामुळे तुझे नाम मोठे आहे.


हे राष्ट्रांच्या राजा, तुला कोण भिणार नाही? हे तुला साजते; राष्ट्रांतील सर्व ज्ञात्यांत, त्यांच्या सर्व राज्यांत तुझ्यासमान कोणीच नाही.


आणि सत्याने, न्यायाने व सरळपणाने परमेश्वराच्या जीविताची शपथ वाहशील, तर राष्ट्रे परमेश्वराच्या ठायी आपणांस धन्य गणतील व त्याचा अभिमान बाळगतील.”


आपण स्वप्नात असे पाहिले की कोणाचा हात न लागता त्या पर्वतापासून एक पाषाण आपोआप सुटला आणि त्याने लोखंड, पितळ, माती, रुपे व सोने ह्यांचे चूर्ण केले; त्यावरून पुढे काय होणार हे त्या थोर देवाने महाराजांच्या हुजुरास कळवले आहे; हेच आपले स्वप्न व त्याचा अर्थही निःसंशय हाच आहे.”


मग ते अदोमाच्या अवशेषाचा व ज्यांना माझे नाव ठेवले आहे त्या सर्व राष्ट्रांचा ताबा घेतील,” असे हे कृत्य करणारा परमेश्वर म्हणतो.


तो परमेश्वराच्या सामर्थ्याने, आपला देव परमेश्वर ह्याच्या नामाच्या प्रतापाने उभा राहील, तो कळप चारील; आणि ते वस्ती करतील, कारण त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पसरेल.


परमेश्वर त्यांना भयावह होईल; पृथ्वीवरच्या सर्व दैवतांचा तो क्षय करील; तेव्हा सर्व राष्ट्रद्वीपे व प्रत्येक जण आपापल्या स्थानी त्याला भजेल.


तेव्हा मी राष्ट्रांना शुद्ध वाणी देईन, व परमेश्वराची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नामाचा धावा एकचित्ताने1 करतील.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो : मी आपल्या लोकांचा उगवतीकडून व मावळतीकडून उद्धार करीन;


आपल्या कळपात नर असून त्याचा नवस केल्यावर कोणी सदोष पशूचा यज्ञ करतो; असा फसवणारा शापित असो. मी थोर राजा आहे व राष्ट्रांत माझ्या नावाची भीती धरतात, असे परमेश्वर म्हणतो.


रुपे गाळून शुद्ध करणार्‍यासारखा तो बसेल, व लेवीच्या वंशजांना शुद्ध करील; त्यांना सोन्यारुप्याप्रमाणे शुद्ध करील. मग ते नीतिमत्तेने परमेश्वराला बली अर्पण करतील.


धूपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र;


तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या;


मी तुम्हांला सांगतो की, ‘पूर्वेकडून व पश्‍चिमेकडून’ पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्या पंक्तीस बसतील;


धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करत होता.


म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हांला विनवतो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.


ती कृपा अशी की, मी परराष्ट्रीयांसाठी येशू ख्रिस्ताचा सेवक होऊन देवाच्या सुवार्तेचा याजक व्हावे; अशासाठी की, परराष्ट्रीय हेच अर्पण पवित्र आत्म्याने शुद्ध होऊन मान्य व्हावे.


मला सर्वकाही आहे व ते विपुल आहे; एपफ्रदीताच्या हाती तुम्ही जे पाठवले त्याने मी भरून गेलो आहे. ते जणू काय सुगंध, देवाला मान्य व संतोषकारक1 यज्ञ, असे आहे.


ह्यासाठी की, आपला देव व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेने आपला प्रभू येशू ह्याच्या नावाला तुमच्या ठायी व तुम्हांला त्याच्या ठायी गौरव मिळावा.


प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे.


सातव्या देवदूताने कर्णा वाजवला; तेव्हा स्वर्गात मोठ्या वाणी झाल्या; त्या म्हणाल्या : “जगाचे ‘राज्य’ आमच्या ‘प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे’ झाले आहे; आणि ‘तो युगानुयुग राज्य करील.”’


‘हे प्रभो, तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही?’ कारण तूच मात्र ‘पवित्र’ आहेस; आणि तुझी न्यायकृत्ये प्रकट झाली आहेत, म्हणून ‘सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन तुला नमन करतील.”’


त्याने गुंडाळी घेतली तेव्हा ते चार प्राणी व चोवीस वडील कोकर्‍याच्या पाया पडले. त्या प्रत्येकाजवळ वीणा व ‘धूपाने’ भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या; त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या ‘प्रार्थना’ होत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan