Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 9:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तेव्हा घडत असलेल्या सर्व गोष्टींविषयी मांडलिक हेरोदाने ऐकले; आणि तो मोठ्या घोटाळ्यात पडला, कारण योहान मेलेल्यातून उठला आहे असे कित्येक जण म्हणत होते;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 घडत असलेल्या सर्व गोष्टी ऐकून हेरोद राजा फार घोटाळ्यात पडला, कारण “योहान मरण पावलेल्यांमधून उठला आहे.” असे कित्येक म्हणत होते;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 त्या वेळी घडत असलेल्या सर्व गोष्टींविषयी राज्यकर्त्या हेरोदने ऐकले आणि तो फार संभ्रमात पडला; कारण योहान मेलेल्यातून उठला आहे, असे कित्येक लोक म्हणत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 येशूंबद्दल शासक हेरोदाने सर्वकाही ऐकले. तेव्हा तो घोटाळ्यात पडला. कारण काही लोक म्हणत होते, “हा बाप्तिस्मा करणारा योहान पुन्हा जिवंत झाला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 9:7
13 Iomraidhean Croise  

एका क्षणात त्यांची कशी धूळधाण झाली आहे! भयाने ते अगदी गांगरून गेले आहेत;


कारण दृष्टान्ताच्या खोर्‍यात हा दिवस प्रभू, सेनाधीश परमेश्वर ह्याने गडबडीचा, पायमल्लीचा व घाबरण्याचा असा नेमलेला आहे; ह्या दिवशी भिंती मोडतील आणि डोंगरात आरोळ्यांचा प्रतिध्वनी होईल.


त्यांच्यातला जो उत्तम तो काटेरी झुडपासारखा आहे; त्यांच्यातला जो सरळ तो काटेरी कुंपणाहून वाईट आहे; तुझ्या टेहळणी करणार्‍यांनी टेहळलेला दिवस, तुझी झडती घेण्याचा दिवस येत आहे; आता त्यांची त्रेधा उडेल.


योहान बंदिशाळेत असताना त्याने ख्रिस्ताच्या कृत्यांविषयी ऐकून आपल्या शिष्यांना पाठवून त्याला विचारले,


त्यांनी त्याला उत्तर दिले, “बाप्तिस्मा करणारा योहान; कित्येक एलीया; कित्येक संदेष्ट्यांपैकी एक असे म्हणतात.”


त्याच घटकेस कित्येक परूशी येऊन त्याला म्हणाले, “येथून निघून जा, कारण हेरोद तुम्हांला जिवे मारायला पाहत आहे.”


तेव्हा सूर्य, चंद्र व तारे ह्यांत चिन्हे घडून येतील, आणि पृथ्वीवर ‘समुद्र व लाटा ह्यांच्या गर्जनेने राष्ट्रे’ घाबरी होऊन पेचात पडतील;


आणि तो हेरोदाच्या अंमलातला आहे असे समजल्यावर त्याने त्याला हेरोदाकडे पाठवले, कारण तोही त्या दिवसांत यरुशलेमेत होता.


तिबिर्य कैसर ह्याच्या राज्याच्या पंधराव्या वर्षी पंतय पिलात यहूदीयाचा अधिकारी होता; हेरोद गालीलाचा मांडलिक, त्याचा भाऊ फिलिप्प हा इतुरीया व त्राखोनीती ह्या देशांचा मांडलिक व लूसनिय अबिलेनेचा मांडलिक होता;


त्यांनी उत्तर दिले, “बाप्तिस्मा करणारा योहान; पण कित्येक म्हणतात एलीया; आणि कित्येक म्हणतात की, प्राचीन संदेष्ट्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan