Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 9:43 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

43 देवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले. येशूने केलेल्या सर्व कृत्यांवरून सर्व लोक आश्‍चर्य करत असता तो आपल्या शिष्यांना म्हणाला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

43 मग देवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले आणि तो जी कामे करीत होता त्या सर्वांवरून सर्वजण आश्चर्य करीत असता तो आपल्या शिष्यांना म्हणाला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

43 अदेवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले! बयेशूने केलेल्या सर्व कृत्यांवरून सर्व लोक आश्‍चर्य व्यक्त करीत असता, तो त्याच्या शिष्यांना म्हणाला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

43 परमेश्वराच्या शक्तीचे हे प्रात्यक्षिक पाहून लोक आश्चर्यचकित झाले. येशू करीत असलेल्या चमत्कारांच्या गोष्टींविषयी लोक आश्चर्य व्यक्त करीत असतानाच, येशू आपल्या शिष्यांना म्हणाले,

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 9:43
14 Iomraidhean Croise  

भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो; तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो : त्या दिवसांत ह्या अवशिष्ट राष्ट्रांना ही गोष्ट अचंब्याची वाटते म्हणून माझ्याही दृष्टीने अचंब्याची होईल काय? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


ते गालीलात एकत्र जमले असता येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र लोकांच्या हाती धरून दिला जाणार आहे;


आणि तो त्यांच्याकडे मचव्यात चढून गेला; तेव्हा वारा पडला; मग ते मनातल्या मनात फारच आश्‍चर्यचकित झाले.


तत्क्षणी त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा गौरव करत त्याच्यामागे चालू लागला; तेव्हा सर्व लोकांनी हे पाहून देवाचे स्तवन केले.


तेव्हा सर्व जण विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, “काय हे बोलणे? हा अधिकाराने व सामर्थ्याने अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो आणि ते निघून जातात!”


तेव्हा ते सर्व अगदी थक्क झाले; ते देवाचा महिमा वर्णू लागले आणि फार भयभीत होऊन म्हणाले, “आम्ही आज विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत.”


कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्व जण विस्मित झाले होते;


तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “तुमचा विश्वास कोठे आहे?” ते भयभीत होऊन विस्मित झाले व एकमेकांना म्हणाले, “हा आहे तरी कोण? कारण वारे व पाणी ह्यांनादेखील हा आज्ञा करतो व ते त्याचे ऐकतात.”


तो जवळ येत आहे इतक्यात भुताने त्याला आपटले व पिळून टाकले, पण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला धमकावले; आणि मुलाला बरे करून त्याच्या बापाजवळ परत दिले.


कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथांना अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व आगमन ह्यांसंबंधाने तुम्हांला कळवले असे नाही; तर आम्ही त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहणारे होतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan