Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 9:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 तो जवळ येत आहे इतक्यात भुताने त्याला आपटले व पिळून टाकले, पण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला धमकावले; आणि मुलाला बरे करून त्याच्या बापाजवळ परत दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 मग तो जवळ येत आहे इतक्यात भूताने त्यास खाली आपटले व भारी पिळून टाकले, पण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला धमकावले व मुलाला बरे करून त्याच्या पित्याजवळ परत दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

42 तो जवळ येत आहे, इतक्यात भुताने त्याला आपटले व मूर्च्छित अवस्थेत टाकून दिले, पण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला निघून जाण्याचा हुकूम सोडला आणि मुलाला बरे करून त्याच्या वडिलांजवळ परत दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 मुलगा येशूंकडे येत असताना, अशुद्ध आत्म्याने त्याला जमिनीवर आपटले व त्याला झटके आले. परंतु येशूंनी दुरात्म्याला धमकावून त्या मुलाला बरे केले व वडिलांच्या स्वाधीन केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 9:42
12 Iomraidhean Croise  

एलीया ते बालक घेऊन माडीवरून खाली आला आणि त्याला त्याच्या आईच्या हवाली करून म्हणाला, “पाहा, तुझा मुलगा जिवंत आहे.”


मग त्याने गेहजीला हाक मारून सांगितले, “त्या शूनेमकरिणीला बोलाव.” त्याने बोलावल्यावर ती त्याच्याकडे आली तेव्हा तो तिला म्हणाला, “आपल्या पुत्राला उचलून घे.”


त्यांनी त्याला त्याच्याकडे आणले, तेव्हा त्या आत्म्याने येशूला पाहताच मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला.


तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले.


आणि पाहा, कोणीएक आत्मा त्याला धरतो, आणि हा एकाएकी ओरडतो; मग तो ह्याला असा पिळतो की ह्याला फेस येतो; तो ह्याला पुष्कळ ठेचतो व ह्याला सोडता सोडत नाही.


येशूने म्हटले, “अहो विश्वासहीन व कुटिल पिढीचे लोकहो, मी कोठवर तुमच्याबरोबर राहू व तुमचे सोसू? तू आपल्या मुलाला इकडे आण.”


देवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले. येशूने केलेल्या सर्व कृत्यांवरून सर्व लोक आश्‍चर्य करत असता तो आपल्या शिष्यांना म्हणाला,


मग सुमारे कोस सव्वा कोस वल्हवून गेल्यावर त्यांनी येशूला समुद्रावरून मचव्याच्या जवळ चालत येताना पाहिले आणि त्यांना भय वाटले;


मग त्याने तिला हात देऊन उठवले; आणि पवित्र जनांना व विधवांना बोलावून त्यांच्यापुढे तिला सजीव असे उभे केले.


म्हणून ‘स्वर्गांनो’ व त्यांत राहणार्‍यांनो, ‘उल्लास करा!’ पृथ्वी व समुद्र ह्यांत राहणार्‍यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुमच्याकडे आला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan