Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 9:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 दिवस उतरू लागला तेव्हा ते बारा प्रेषित जवळ येऊन त्याला म्हणाले, “लोकसमुदायाला निरोप द्या, म्हणजे ते भोवतालच्या गावांत व शेतामळ्यांत जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील; कारण आपण येथे रानातल्या ठिकाणी आहोत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 दिवस संपत आला, तेव्हा बारा जण जवळ येऊन त्यास म्हणाले, “समुदायाला निरोप दे, म्हणजे ते आसपासच्या गावांत व खेड्यांत जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील; कारण आपण येथे रानातल्या ठिकाणी आहो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 दिवस उतरू लागला, तेव्हा बारा प्रेषित जवळ येऊन त्याला म्हणाले, “लोकांना निरोप द्या, म्हणजे ते भोवतालच्या गावांत व शेतामळ्यांत जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील; कारण आपण येथे निर्जन ठिकाणी आहोत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 दुपार टळल्यानंतर बारा शिष्य त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, “लोकांना पाठवून द्या म्हणजे ते आजूबाजूच्या खेड्यांमध्ये व गावांमध्ये जातील आणि त्यांच्या खाण्याची व राहण्याची व्यवस्था करतील, कारण आपण येथे निर्जन ठिकाणी आहोत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 9:12
13 Iomraidhean Croise  

मी क्षेमवचन देऊन त्यांच्याबरोबर करार करीन, देशातून दुष्ट पशू नाहीतसे करीन म्हणजे मग ते रानात निर्भय असे राहतील व जंगलात झोप घेतील.


मी रानात, रखरखीत प्रदेशात तुला खाऊ घातले.


ते ऐकून येशू तेथून तारवात बसून निघाला आणि अरण्यात एकान्ती गेला; हे ऐकून लोकसमुदाय नगरातून त्याच्यामागे पायीपायी गेले.


तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली, “तिला पाठवून द्या; कारण ती आमच्यामागून ओरडत येत आहे.”


मग येशूने आपल्या शिष्यांना बोलावून म्हटले, “मला लोकांचा कळवळा येतो, कारण ते आज तीन दिवस माझ्याजवळ आहेत आणि त्यांच्याजवळ खायला काहीही नाही; कदाचित ते वाटेत कासावीस होतील; म्हणून त्यांना उपाशी लावून द्यावे अशी माझी इच्छा नाही.”


हे समजल्यावर लोकसमुदाय त्याच्यामागून गेले; तेव्हा त्यांचे स्वागत करून तो त्यांच्याबरोबर देवाच्या राज्याविषयी बोलत होता, आणि ज्यांना बरे होण्याची गरज होती त्यांना तो बरे करत होता.


पण तो त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते म्हणाले, “आम्ही जाऊन ह्या लोकांसाठी अन्न विकत आणले नाही तर पाच भाकरी व दोन मासे एवढ्याशिवाय आमच्याजवळ काही नाही.”


ह्यानंतर येशू गालीलाच्या म्हणजे तिबिर्या समुद्राच्या पलीकडे गेला.


कारण मी कशानेही लाजणार नाही, तर पूर्ण धैर्याने नेहमीप्रमाणे आताही, जगण्याने किंवा मरण्याने, माझ्या शरीराच्या द्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल ही जी माझी अपेक्षा व आशा तिच्याप्रमाणे, ते तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उद्धारास कारण होईल, हे मला ठाऊक आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan