Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 8:43 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

43 तेव्हा बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली (जिने आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्च केली होती) व कोणालाही बरी करता न आलेली अशी कोणीएक स्त्री

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

43 आणि बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली कोणीएक स्त्री, जी (आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्ची घालून) कोणाकडूनही निरोगी होईना,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

43 तेथे बारा वर्षे रक्‍तस्राव होत असलेली व कोणालाही बरी करता न आलेली अशी एक स्त्री

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

43 आणि तिथे एक स्त्री होती जी बारा वर्षे रक्तस्रावाने आजारी होती, परंतु कोणीही तिला बरे करू शकले नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 8:43
22 Iomraidhean Croise  

आसाच्या पायांना त्याच्या कारकिर्दीच्या एकोण-चाळिसाव्या वर्षी व्याधी झाला; तो व्याधी बराच वाढला; तथापि त्या रोगात तो परमेश्वराला शरण न जाता वैद्यांना शरण गेला.


तुम्ही तर लबाड्या प्रवृत्त करणारे आहात. तुम्ही सर्व कवडीमोल वैद्य आहात.


शत्रूंपासून तू आमची सुटका कर; कारण मनुष्याचे साहाय्य केवळ व्यर्थ आहे.


मनुष्याचे नावच घेऊ नका; त्याचा श्वास त्याच्या नाकपुड्यांत आहे; त्याला काय जमेस धरायचे आहे?


कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले; परंतु हिने आपल्या कमताईतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली.”


तो जेथे जेथे ह्याला धरतो तेथे तेथे तो त्याला खाली आपटतो, मग हा तोंडाला फेस आणून कडकडा दात खातो व निपचित पडतो. त्याला काढावे म्हणून आपल्या शिष्यांना मी सांगितले, परंतु त्यांना तो काढता येईना.”


तेव्हा पाहा, अठरा वर्षे विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती; ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते.


ही तर अब्राहामाची कन्या आहे; पाहा, हिला सैतानाने अठरा वर्षे बांधून ठेवले होते; शब्बाथ दिवशी हिला ह्या बंधनापासून सोडवणे योग्य नव्हते काय?”


तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला, त्याला भुते लागली होती; बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो कबरांतून राहत असे.


कारण त्याला सुमारे बारा वर्षांची एकुलती एक मुलगी होती, ती मरणास टेकली होती. मग तो जात असता लोकसमुदाय त्याच्याभोवती गर्दी करत होता.


त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि लगेच तिचा रक्तस्राव थांबला.


तो तिकडून जात असता एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला.


तरी आता त्याला दृष्टी कशी आली हे आम्हांला ठाऊक नाही; किंवा त्याचे डोळे कोणी उघडले हेही आम्हांला ठाऊक नाही. त्याला विचारा; तो वयात आलेला आहे, तो स्वत:विषयी सांगेल.”


तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणीएक माणूस होता; त्याला मंदिरात जाणार्‍यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असत.


बरे करण्याचा हा चमत्कार ज्या माणसावर घडला तो माणूस चाळीस वर्षांहून अधिक वयाचा होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan