Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 8:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 कारण त्याला सुमारे बारा वर्षांची एकुलती एक मुलगी होती, ती मरणास टेकली होती. मग तो जात असता लोकसमुदाय त्याच्याभोवती गर्दी करत होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 कारण त्यास सुमारे बारा वर्षाची एकुलती एक मुलगी होती व ती मरणास टेकली होती. मग तो जात असता लोकसमुदाय त्याच्याजवळ दाटी करीत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

42 कारण त्याची सुमारे बारा वर्षांची एकुलती एक मुलगी शेवटच्या घटका मोजत होती. येशू तेथून जात असता लोकसमुदाय त्याच्या भोवती गर्दी करत होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 कारण त्याची बारा वर्षाची एकुलती एक मुलगी मरणाच्या पंथाला लागली होती. येशू वाटेवर असताना, लोकांच्या गर्दीने त्यांना जणू काय चेंगरून टाकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 8:42
15 Iomraidhean Croise  

सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या अवकाशात ते छिन्नभिन्न होतात; त्यांचा कायमचा नाश होतो व कोणी त्यांची पर्वा करीत नाही.


मनुष्य आपल्या निरर्थक आयुष्याचे छायारूप दिवस घालवतो, त्यात त्याला काय लाभ होतो ते कोणास ठाऊक? मनुष्याच्या पश्‍चात भूतलावर काय होईल हे त्याला कोणाच्याने सांगवेल?


“मानवपुत्रा, पाहा, मी तुझ्या नेत्रांना जे प्रिय ते सपाट्यासरशी तुझ्यापासून काढून घेतो; तरी तू शोक करणार नाहीस, रडणार नाहीस, अश्रू गाळणार नाहीस.


“हे मानवपुत्रा, त्यांचे बळ, त्यांचा वैभवमूलक हर्ष, त्यांच्या नेत्रांना प्रिय वाटणार्‍या वस्तू, त्यांच्या जिवाचा इष्टविषय आणि त्यांचे कन्यापुत्र मी त्यांच्यापासून हरण करीन;


आणि मी दाविदाच्या घराण्यावर व यरुशलेमेच्या रहिवाशांवर कृपा व विनवणी ह्यांच्या आत्म्याचा वर्षाव करीन आणि ज्या मला त्यांनी विंधले त्या माझ्याकडे2 ते पाहतील; एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा तसे ते त्याच्यासाठी शोक करतील; ज्येष्ठ पुत्राबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करतो तसा ते त्याबद्दल खेद करतील.


मग तो त्याच्याबरोबर निघाला; तेव्हा पुष्कळ लोक त्याच्यामागून चालले होते व त्याच्याभोवती गर्दी करत होते.


तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहचला तेव्हा पाहा, कोणाएका मृत माणसाला बाहेर नेत होते; तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती; आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते.


तेव्हा पाहा, याईर नावाचा कोणीएक मनुष्य आला; तो सभास्थानाचा अधिकारी होता; त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली.


तेव्हा बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली (जिने आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्च केली होती) व कोणालाही बरी करता न आलेली अशी कोणीएक स्त्री


पण येशू म्हणाला, “मला कोणी स्पर्श केला?” तेव्हा सर्व जण ‘मी नाही’ असे म्हणत असता पेत्र व त्याचे सोबती म्हणाले, “गुरूजी, लोकसमुदाय तुम्हांला दाटी करून चेंगरत आहेत! अन् तुम्ही म्हणता कोणी मला स्पर्श केला?”


एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan