Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 8:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 काटेरी झाडांमध्ये पडलेले हे आहेत की, ते ऐकतात, आणि संसाराच्या चिंता, धन व विषयसुख ह्यांत आयुष्यक्रमण करत असता त्यांची वाढ खुंटते व ते पक्‍वफळ देत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 आणि काटेरी झाडांमध्ये पडणारे बी हे ऐकणारे आहेत, पण पुढे जाता जाता चिंता व धन व या जीवनातली सुखे यांनी गुदमरून जातात व भरदार फळ देत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 काटेरी झुडुपांमध्ये पडलेले बी म्हणजे जे ऐकतात पण संसाराच्या चिंता, धनदौलत व ऐहिक सुख ह्यांत आयुष्यक्रमण करत असता त्यांची वाढ खुंटते व त्यांच्या जीवनात परिपक्व फळ दिसत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 काटेरी झाडांमध्ये काही बी पडले, ते असे आहेत की जे ऐकतात, परंतु जीवन जगतांना, जीवनातील काळजी, पैसा, सुखविलास यामुळे त्यांची वाढ खुंटते व ते परिपक्व होत नाहीत;

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 8:14
17 Iomraidhean Croise  

काटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो.


व नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते.


कोणत्याही चाकराला दोन धन्यांची सेवाचाकरी करता येत नाही; कारण तो एकाचा द्वेष करील व दुसर्‍यावर प्रीती करील; अथवा एकाला धरून राहील व दुसर्‍याला तुच्छ मानील. तुम्हांला देवाची आणि धनाची सेवाचाकरी करता येत नाही.”


तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुमच्यावर ‘पाशाप्रमाणे’ अकस्मात येईल;


खडकाळीवर असलेले हे आहेत की, ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने ग्रहण करतात; पण त्यांना मूळ नसते; ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात व परीक्षेच्या वेळी माघार घेतात.


चांगल्या मातीत पडलेले हे आहेत की, ते वचन ऐकून सालस व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात.


काही काटेरी झाडांमध्ये पडले; काटेरी झाडांनी त्याबरोबर वाढून त्याची वाढ खुंटवली.


कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो; आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात.


प्रस्तुत युगातल्या धनवानांना निक्षून सांग की, तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणांस उपभोगासाठी सर्वकाही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी.


कारण देमासला ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून थेस्सलनीकास गेला; क्रेस्केस गलतीयास, व तीत दालमतियास गेला.


तेव्हा निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्‍चात्ताप, देवावरचा विश्वास,


Lean sinn:

Sanasan


Sanasan