Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 7:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 तेव्हा ज्या परूश्याने त्याला बोलावले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, “हा संदेष्टा असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे, हे त्याने ओळखले असते.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 तेव्हा ज्या परूश्याने येशूला बोलावले होते, त्याने हे पाहून आपल्या मनांत म्हटले, “हा संदेष्टा असता तर जी स्त्री त्यास स्पर्श करीत आहे ती कोण व कोणत्या प्रकारची आहे, म्हणजे ती पापी आहे, हे त्यास कळले असते.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

39 ज्या परुश्याने त्याला बोलाविले होते, त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, “हा संदेष्टा असता, तर आपल्याला स्पर्श करत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे, हे त्याने ओळखले असते.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 ज्या परूश्याने येशूंना भोजनाचे आमंत्रण दिले होते, त्याने हे पाहिले तेव्हा तो मनाशीच म्हणाला, “यावरूनच येशू संदेष्टा नाहीत हे सिद्ध होते, कारण परमेश्वराने त्यांना खरोखरच पाठविले असते, तर ही स्त्री पापी आहे हे त्यांना समजले असते.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 7:39
25 Iomraidhean Croise  

इकडे देवाचा माणूस अलीशा ह्याचा चाकर गेहजी ह्याने विचार केला की, “अरामी नामानाने आणलेला नजराणा माझ्या धन्याने न घेऊन त्याच्यावर दया केली; परमेश्वराच्या जीविताची शपथ मी त्याच्यामागून धावत जाऊन त्याच्यापासून काहीतरी घेतोच.”


कारण तो आपल्या मनात घास मोजणार्‍यासारखा आहे, तो तुला “खा, पी” म्हणतो, पण त्याचे मन तुझ्यावर नाही.


ते म्हणतात, ‘हां! जवळ येऊ नकोस; तुझ्यापेक्षा मी पवित्र आहे.’ ते माझ्या नाकात धुरासारखे, सतत पेटलेल्या अग्नीसारखे आहेत.


ह्याप्रमाणे शेवटले ते पहिले व पहिले ते शेवटले होतील. [कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत.]”


लोकसमुदाय म्हणाले, “गालीलातील नासरेथाहून आलेला हा येशू संदेष्टा आहे.”


कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात;


तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की, ‘मी काय करू? कारण माझे उत्पन्न साठवण्यास मला जागा नाही.’


तेव्हा परूशी व शास्त्रीही अशी कुरकुर करू लागले की, “हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो.”


मग कारभार्‍याने आपल्या मनात म्हटले, ‘माझा धनी माझ्यापासून कारभार काढून घेणार आहे, तर मी आता काय करू? खणण्याची मला शक्ती नाही; भीक मागण्याची लाज वाटते.


पण काही काळपर्यंत तो ते करीना; परंतु नंतर त्याने मनात म्हटले, ‘जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानत नाही,


आता पश्‍चात्तापास योग्य अशी फळे द्या; आणि अब्राहाम आमचा बाप आहे असे आपल्या मनात म्हणू लागू नका. कारण मी तुम्हांला सांगतो, ह्या दगडांपासून अब्राहामासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे.


तेव्हा सर्वांना भय वाटले व ते देवाला गौरवत म्हणाले, “आमच्यामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे.”


तेव्हा पाहा, त्या गावात कोणीएक पापी स्त्री होती; तो परूश्याच्या घरात जेवायला बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली;


आणि त्याच्या पायांशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली; तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायांचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले.


तेव्हा येशूने त्याला म्हटले, “शिमोन, मला तुमच्याबरोबर काही बोलायचे आहे.” तो म्हणाला, “गुरूजी, बोला.”


ती स्त्री त्याला म्हणाली, “महाराज, आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले.


लोकसमुदायांतही त्याच्याविषयी बरीच कुजबुज सुरू झाली. कोणी म्हणत होते, “तो चांगला आहे;” कोणी म्हणत होते, “नाही, तो लोकांना फसवतो.”


मग जो मनुष्य पूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी दुसर्‍यांदा बोलावून म्हटले, “देवाचा गौरव कर, तो मनुष्य पापी आहे हे आम्हांला ठाऊक आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan