Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 7:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 तर मग काय पाहण्यास गेला होता? तलम वस्त्रे धारण केलेल्या माणसाला काय? पाहा, उंची पोशाख करणारे व चैन करणारे राजवाड्यात असतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 तर तुम्ही काय पाहायला बाहेर गेला? मऊ वस्त्रे घातलेल्या मनुष्यास काय? पाहा, भडक पोषाख घातलेले व चैनीत असणारे लोक राजवाड्यांत असतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

25 तर मग काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे परिधान केलेल्या माणसाला काय? पाहा, उंची पोषाख घालणारे व चैन करणारे राजवाड्यात असतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 जर नाही, तर मग काय पाहावयाला तुम्ही गेला होता? किमती पोशाख घातलेला एखादा पुरुष काय? नाही. भारी पोशाख घालणारे व सुखविलासातील लोक राजवाड्यात राहतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 7:25
16 Iomraidhean Croise  

आज मी ऐंशी वर्षांचा आहे; ह्या वयात मला बर्‍यावाइटाचा भेद काय समजणार? आपला दास जे काही खातोपितो त्याची चव त्याला कळते काय! गाणार्‍यांचा व गाणारणींचा शब्द मला ऐकू येतो काय? तर आपल्या दासाने माझ्या स्वामीराजांना भार का व्हावे?


त्याच्या मेजवानीतील पक्वान्ने, त्याच्या कामदारांची आसने, त्याच्या मानकर्‍यांची खिदमत व त्यांचे पोशाख, त्याचे प्यालेबरदार व परमेश्वराच्या मंदिरात चढून जायचा त्याचा तो जिना हे सगळे पाहून शबाची राणी गांगरून गेली.


ते म्हणाले, “त्याच्या अंगात केसांचा झगा होता व त्याच्या कंबरेस कातड्याचा कमरबंद होता.” तो म्हणाला, “तो एलीया तिश्बीच.”


वश्ती राणीचे सौंदर्य देशोदेशीच्या लोकांना व सरदारांना दाखवावे म्हणून तिला राजमुकुट घालून आपल्यापुढे घेऊन यावे; कारण ती फार देखणी होती.


आपल्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी आपले सर्व सरदार व सेवक ह्यांना मेजवानी दिली; पारस व मेदय ह्यांचे सेनापती, प्रांतोप्रांतीचे महाजन व सरदार त्याच्यापुढे हजर झाले;


तो राजमंदिराच्या दरवाजासमोरही गेला; गोणपाट नेसून राजमंदिराच्या दरवाजाच्या आत येण्याची कोणास परवानगी नसे.


तिसर्‍या दिवशी एस्तेर राणी आपली राजकीय वस्त्रे धारण करून राजमंदिराच्या आतल्या चौकात जाऊन राजमंदिरासमोर उभी राहिली; राजा राजमंदिरात सिंहासनावर राजद्वारासमोर बसला होता.


मग मर्दखय निळ्या, पांढर्‍या रंगाची राजकीय वस्त्रे लेवून, डोक्यांवर सोन्याचा मुकुट ठेवून व तलम सणाचा व जांभळ्या रंगाचा झगा घालून राजासमोरून निघाला; तेव्हा शूशन नगराचे लोक आनंदाने जयघोष करू लागले.


त्याने उरस्त्राणाप्रमाणे न्यायत्व धारण केले व आपल्या मस्तकी तारणरूप शिरस्त्राण घातले; सूडरूपी पेहराव तो ल्याला. आवेशरूप झग्याने आपले अंग त्याने झाकले.


तर मग काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे धारण केलेल्या माणसाला काय? पाहा, तलम वस्त्रे वापरणारे राजवाड्यात असतात.


ह्या योहानाचे वस्त्र उंटांच्या केसांचे होते, त्याच्या कंबरेस कातड्याचा कमरबंद होता, आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता.


तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांतल्या एकासारखाही सजला नव्हता.


कोणीएक श्रीमंत मनुष्य होता; तो जांभळी व तलम वस्त्रे घालत असे, आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करत असे.


मग योहानाचे निरोप्ये गेल्यावर तो योहानाविषयी लोकसमुदायांना म्हणू लागला, “तुम्ही काय पाहण्यास रानात गेला होता? वार्‍याने हलवलेला बोरू काय?


तर तुम्ही काय पाहण्यास गेला होता? संदेष्ट्याला काय? मी तुम्हांला सांगतो, होय; संदेष्ट्याहूनही जो श्रेष्ठ त्याला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan