Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 7:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा कोणाएका शताधिपतीचा एक आवडता दास आजारी पडून मरणास टेकला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तेव्हा कोणाएका शताधीपतीचा आवडता दास आजारी होऊन मरणास टेकला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 तेथे एका रोमन अधिकाऱ्याच्या मर्जीतला दास आजारी पडून मरणास टेकला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तिथे एका शताधिपतीचा सेवक, जो त्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता, तो आजारी असून मरावयास टेकला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 7:2
24 Iomraidhean Croise  

तो म्हणाला, “माझा धनी अब्राहाम ह्याचा देव परमेश्वर धन्यावादित आहे; त्याने माझ्या धन्यावर दया करण्याचे व त्याच्याशी सत्यतेने वर्तण्याचे सोडले नाही; परमेश्वराने मला नीट वाट दाखवून माझ्या धन्याच्या भाऊबंदांच्या घरी पोचवले आहे.”


रिबकेची दाई दबोरा ही मरण पावली व तिला बेथेलच्या खालच्या बाजूस अल्लोन वृक्षाखाली पुरले; ह्या वृक्षाचे अल्लोन-बाकूथ (रुदनवृक्ष) असे नाव ठेवले.


मी असत्याची सोबत केली असली, माझ्या पायांनी कपटाकडे धाव घेतली असली,


कोणी आपल्या चाकराला बाळपणापासून लाडाने वाढवले, तर तो शेवटी मुलगाच1 होऊन बसेल.


शताधिपती व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे, हा भूमिकंप व घडलेल्या गोष्टी पाहून, अत्यंत भयभीत झाले व “खरोखर हा देवाचा पुत्र होता,” असे म्हणाले.


तेव्हा जे झाले ते पाहून शताधिपतीने देवाचा गौरव करून म्हटले, “खरोखर हा मनुष्य नीतिमान होता.”


नंतर ही सर्व वचने लोकांच्या कानी पडल्यावर तो आपले बोलणे समाप्त करून कफर्णहूमास गेला.


त्याने येशूविषयी ऐकून यहूद्यांच्या वडील मंडळीस त्याच्याकडे पाठवले व विनंती केली की, आपण येऊन माझ्या दासाला वाचवावे.


कारण त्याला सुमारे बारा वर्षांची एकुलती एक मुलगी होती, ती मरणास टेकली होती. मग तो जात असता लोकसमुदाय त्याच्याभोवती गर्दी करत होता.


कैसरीया येथे कर्नेल्य नावाचा कोणीएक पुरुष इटलिक म्हटलेल्या पलटणीत शताधिपती होता.


जो देवदूत त्याच्याबरोबर बोलत होता तो निघून गेल्यानंतर त्याने आपल्या घरच्या दोघा चाकरांना व आपल्या हुजरातीतल्या एका भक्तिमान शिपायाला बोलावले;


हे ऐकून शताधिपतीने सरदाराजवळ जाऊन म्हटले, “आपण हे काय करत आहात? तो माणूस रोमी आहे.”


तेव्हा पौलाने एका शताधिपतीला बोलावून म्हटले, “ह्या तरुणाला सरदाराकडे घेऊन जा; ह्याला त्यास काही सांगायचे आहे.”


नंतर आम्ही इटली देशास तारवातून जावे असे ठरल्यावर पौलाला व दुसर्‍या कित्येक बंदिवानांना बादशाही पलटणीचा यूल्य नावाचा शताधिपती ह्याच्या स्वाधीन करण्यात आले.


दुसर्‍या दिवशी आम्ही सीदोनास पोहचलो, तेव्हा यूल्याने पौलाबरोबर सौजन्याने वागून त्याच्या मित्रांनी त्याचा पाहुणचार करावा म्हणून त्यांच्याकडे जाण्यास त्याला परवानगी दिली.


तथापि पौलाला वाचवावे अशा इच्छेने शताधिपती त्यांच्या बेतास आडवा आला; आणि त्याने हुकूम दिला की, ‘ज्यांना पोहता येत असेल त्यांनी पहिल्याने उडी टाकून किनार्‍यास जावे,


दासांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या व्यवहारातल्या धन्यांच्या आज्ञा पाळा, माणसांना संतोषवणार्‍या नोकरांसारखे तोंडदेखल्या चाकरीने नका; तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून पाळा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan