Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 7:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 मग योहानाने आपल्या शिष्यांतील दोघांना जवळ बोलावून प्रभूकडे असे विचारण्यास पाठवले की, “जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसर्‍याची वाट पाहावी?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 नंतर योहानाने आपल्या दोन शिष्यांना बोलावले आणि त्याने त्यांना प्रभूकडे हे विचारण्यासाठी पाठवले की, जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 योहानने त्याच्या शिष्यांतील दोघांना जवळ बोलावून प्रभूकडे असे विचारायला पाठवले, “जो येणार आहे तो आपणच की, आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 आणि त्यांना प्रभूकडे विचारण्यास पाठविले: “जे यावयाचे ते आपण आहात किंवा आम्ही इतर कोणाची वाट पाहावी?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 7:19
38 Iomraidhean Croise  

तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीवार्र्दित होतील.”


आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडशील.”


यहूदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत1 ते त्याच्याकडून जाणार नाही, राजदंड त्याच्या पायांमधून ढळणार नाही; राष्ट्रे त्यांची आज्ञांकित होतील.


इशायाच्या बुंध्याला धुमारा फुटेल; त्याच्या मुळांतून फुटलेली शाखा फळ देईल;


ह्यास्तव प्रभू स्वत: तुम्हांला चिन्ह देत आहे; पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल (आमच्यासन्निध देव) असे ठेवील.


हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे.


मी सर्व राष्ट्रांना हलवून सोडीन म्हणजे सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तू येतील;1 आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


सीयोनकन्ये, जोराने आनंदाचा गजर कर; यरुशलेमकन्ये, गजर कर; पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो न्यायी व यशस्वी आहे; तो लीन आहे; गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे.


पण तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरणारे त्या तुमच्यावर न्याय्यत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखांच्या ठायी आरोग्य असेल; तुम्ही गोठ्यातल्या वत्सांप्रमाणे बाहेर पडून बागडाल.


नंतर त्या बारा जणांना आपल्या जवळ बोलावून तो त्यांना जोडीजोडीने पाठवू लागला; त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यांवरचा अधिकार दिला.


ह्यानंतर प्रभूने आणखी बाहत्तर3 जणांना नेमून ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वत: जाणार होता तेथे दोघे-दोघे असे त्यांना आपल्यापुढे पाठवले.


मग असे झाले की, तो एका ठिकाणी प्रार्थना करत होता; ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यांतील एकाने त्याला म्हटले, “प्रभूजी, जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करण्यास शिकवले तसे आपणही आम्हांला शिकवा.”


परंतु प्रभूने त्याला म्हटले, “तुम्ही परूशी ताटवाटी बाहेरून स्वच्छ करता; पण तुमचा अंतर्भाग जुलूम व दुष्टपणा ह्यांनी भरला आहे.


तेव्हा प्रभू म्हणाला, “आपल्या परिवाराला योग्य वेळी शिधासामग्री द्यायला धनी ज्याला नेमील असा विश्वासू व विचारशील कारभारी कोण?


परंतु प्रभूने त्याला उत्तर दिले, “अहो ढोंग्यांनो, तुमच्यापैकी प्रत्येक जण आपला बैल किंवा गाढव शब्बाथ दिवशी ठाणावरून सोडून पाण्यावर नेतो ना?


मग प्रेषित प्रभूला म्हणाले, “आमचा विश्वास वाढवा.”


प्रभू म्हणाला, “तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल, तर ह्या तुतीला, ‘तू मुळांसकट उपटून समुद्रात लावली जा,’ असे तुम्ही सांगताच ती तुमचे ऐकेल.


तेव्हा प्रभूने म्हटले, “अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका.


तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभूजी, पाहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यांस देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो.”


तेव्हा प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली; आणि ‘आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील,’ असे जे प्रभूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले.


ते म्हणत होते की, “प्रभू खरोखर उठला आहे व शिमोनाच्या दृष्टीस पडला.”


तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, “रडू नकोस.”


ती माणसे त्याच्याकडे येऊन म्हणाली, “बाप्तिस्मा करणार्‍या योहानाने आम्हांला आपल्याकडे असे विचारण्यास पाठवले आहे की, जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुसर्‍याची वाट पाहावी?”


ज्या मरीयेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले तिचा हा, आजारी पडलेला लाजर, भाऊ होता.


येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करून त्यांचा बाप्तिस्मा करत आहे हे परूश्यांच्या कानी गेले आहे असे जेव्हा प्रभूला कळले,


ती स्त्री त्याला म्हणाली, “मशीहा, ज्याला ख्रिस्त म्हणतात, तो येणार आहे हे मला ठाऊक आहे; तो आल्यावर आम्हांला सर्व गोष्टी सांगेल.”


तरी जेथे प्रभूने आभार मानल्यावर त्यांनी भाकर खाल्ली होती त्या ठिकाणाजवळ तिबिर्याहून दुसरे लहान मचवे आले होते.


नूनाचा मुलगा यहोशवा ह्याने गुप्तपणे दोन हेर शिट्टीम येथून पाठवले; त्याने त्यांना सांगितले की, “जा आणि तो देश व विशेषत: यरीहो हेरून या.” त्याप्रमाणे ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले.


माझे दोन साक्षी ह्यांना मी अधिकार देईन आणि ते तरट पांघरून एक हजार दोनशे साठ दिवस संदेश सांगतील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan