Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 7:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तेव्हा सर्वांना भय वाटले व ते देवाला गौरवत म्हणाले, “आमच्यामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 तेव्हा सर्वांना भय वाटले आणि ते देवाला गौरव करीत म्हणाले, “आमच्यामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 सर्वांना भय वाटले व ते देवाचा गौरव करत म्हणाले, “आमच्यामध्ये महान संदेष्टा उदयास आला आहे, देवाने त्याच्या लोकांची भेट घेतली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 हे पाहून सर्व लोक भयचकित झाले आणि परमेश्वराची स्तुती करीत म्हणाले, “आम्हामध्ये एक थोर संदेष्टा उदय पावला आहे. परमेश्वर आपल्या लोकांच्या साहाय्यासाठी आले आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 7:16
31 Iomraidhean Croise  

तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजवली आहेस; तू तिला फार फलद्रूप करतोस; देवाची नदी जलपूर्ण आहे; भूमी तयार करून तू मनुष्यांना धान्य पुरवतोस.


तेव्हा लोकांना विश्वास वाटला; परमेश्वराने इस्राएलवंशजांची भेट घेऊन त्यांची विपत्ती पाहिली हे त्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी नमन करून त्याची आराधना केली.


आणि ह्या नगराचे नाव पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांसमोर माझ्या आनंदास, स्तुतीस व सन्मानास कारण होईल; त्यांचे मी जे कल्याण करीन त्याविषयी ती ऐकतील; आणि मी त्यांना हित व शांती प्राप्त करून देईन; ह्या सर्वांमुळे ती राष्ट्रे भयभीत होतील व थरथर कापतील.


मुके बोलतात, व्यंग असलेले धड होतात, लंगडे चालतात व आंधळे पाहतात, हे पाहून लोकसमुदायाने आश्‍चर्य केले आणि इस्राएलाच्या देवाचा गौरव केला.


लोकसमुदाय म्हणाले, “गालीलातील नासरेथाहून आलेला हा येशू संदेष्टा आहे.”


तेव्हा त्या स्त्रिया भीतीने व हर्षातिशयाने कबरेपासून लवकर निघून त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगण्यास धावत गेल्या.


हे पाहून लोकसमुदाय भयचकित झाले आणि ज्या देवाने माणसांना एवढा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला.


ह्यावरून त्यांच्याभोवती राहणार्‍या सर्वांना त्याचे भय वाटले; आणि यहूदीयाच्या सगळ्या डोंगराळ प्रदेशात ह्या सर्व गोष्टींविषयी लोक बोलू लागले.


“इस्राएलाचा देव प्रभू धन्यवादित असो, कारण त्याने ‘आपल्या लोकांची’ भेट घेऊन त्यांची ‘खंडणी भरून सुटका’ केली आहे;


तुला व ‘तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील’ आणि तुझ्यामध्ये चिर्‍यावर चिरा राहू देणार नाहीत; कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस.”


नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचा गौरव व स्तुती करत परत गेले.


तो त्यांना म्हणाला, “कसल्या गोष्टी?” त्यांनी त्याला म्हटले, “नासरेथकर येशूविषयीच्या. तो देवाच्या व सर्व लोकांच्या समोर, कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता.


तेव्हा ते सर्व अगदी थक्क झाले; ते देवाचा महिमा वर्णू लागले आणि फार भयभीत होऊन म्हणाले, “आम्ही आज विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत.”


हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, “प्रभूजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे.”


तेव्हा तो मेलेला उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले.


तेव्हा ज्या परूश्याने त्याला बोलावले होते त्याने हे पाहून आपल्या मनात म्हटले, “हा संदेष्टा असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण व कशी आहे, म्हणजे ती पापी आहे, हे त्याने ओळखले असते.”


तेव्हा गरसेकरांच्या चहूकडल्या प्रांतांतील सर्व लोकांनी त्याला आपल्या येथून निघून जाण्याची विनंती केली; कारण ते फार घाबरले होते. मग तो मचव्यात बसून परत जाण्यास निघाला.


त्यांनी उत्तर दिले, “बाप्तिस्मा करणारा योहान; पण कित्येक म्हणतात एलीया; आणि कित्येक म्हणतात की, प्राचीन संदेष्ट्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे.”


तेव्हा त्यांनी त्याला विचारले, “तर मग आपण कोण आहात? एलीया आहात काय?” तो म्हणाला, “मी नाही.” “आपण तो संदेष्टा आहात काय?” त्यावर त्याने “नाही” असे उत्तर दिले.


त्यांनी त्याला विचारले, “आपण ख्रिस्त नाही, एलीया नाही, व तो संदेष्टाही नाही, तर बाप्तिस्मा का करता?”


ती स्त्री त्याला म्हणाली, “महाराज, आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले.


तेव्हा येशूने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, “जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच होय.”


म्हणून पुन्हा ते त्या आंधळ्याला म्हणाले, “त्याने तुझे डोळे उघडले तर त्याच्याविषयी तू काय म्हणतोस?” त्याने म्हटले, “तो संदेष्टा आहे.”


हे शब्द ऐकताच हनन्याने खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणार्‍या सर्वांना मोठे भय वाटले.


तोच मोशे इस्राएल लोकांना म्हणाला, ‘तुमचा देव परमेश्वर तुमच्या बांधवांमधून माझ्यासारखा संदेष्टा तुमच्यासाठी उत्पन्न करील;’ [त्याचे तुम्ही ऐका].


आणि ते माझ्यावरून देवाचा गौरव करत असत.


तुझा देव परमेश्वर तुझ्यामधून म्हणजे तुझ्या भाऊबंदांमधून माझ्यासारखा एक संदेष्टा तुझ्याकरता उभा करील, त्याचे तुम्ही ऐका;


Lean sinn:

Sanasan


Sanasan