लूककृत शुभवर्तमान 7:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहचला तेव्हा पाहा, कोणाएका मृत माणसाला बाहेर नेत होते; तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती; आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 जसा तो गावाच्या वेशीजवळ आला तेव्हा पाहा कोणाएका मरण पावलेल्या मनुष्यास बाहेर घेऊन जात होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता व ती विधवा होती; आणि गावातील बरेच लोक तिच्याबरोबर होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहचला, तेव्हा तेथून एका मृत माणसाची अंत्ययात्रा जात होती. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता व ती विधवा होती. त्या नगरातले पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 ते गावाच्या वेशीजवळ आले असता एका मुलाची प्रेतयात्रा बाहेर पडत होती व तो आपल्या विधवा आईचा एकुलता एक पुत्र होता. तिच्याबरोबर गावातील मोठा लोकसमूह होता. Faic an caibideil |
आता पाहा, माझ्या कुळातले सर्व लोक आपल्या ह्या दासीवर उठले आहेत; ते म्हणतात की, ज्याने आपल्या भावाचा प्राणघात केला त्याला आमच्या स्वाधीन कर. आपल्या भावाचा त्याने वध केला आहे, म्हणून त्याचा प्राण त्याच्या भावाच्या प्राणाबद्दल घेऊ, आणि तुझ्या त्या वारसाचाही नाश करू; ह्या प्रकारे माझा उरलेला निखारा विझवून टाकून माझ्या पतीचे नाव व संतती भूतलावरून नष्ट करायला ते पाहत आहेत.”