लूककृत शुभवर्तमान 6:48 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 तो कोणाएका घर बांधणार्या माणसासारखा आहे. त्याने खोल खणून खडकावर पाया घातला; मग पूर आला, तेव्हा त्याचा लोंढा त्या घरावर आदळला तरी त्यामुळे ते हालले नाही; कारण ते मजबूत बांधले होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 तो एका घर बांधणाऱ्या मनुष्यासारखा आहे. त्याने खोल खोदले आणि खडकावर पाया बांधला. मग पूर आला आणि पाण्याचा लोंढा घरावर आदळला, पण पाण्याने ते हलले नाही, कारण ते चांगले बांधले होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)48 तो एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्याने खोल खणून खडकावर पाया घातला. पूर आला तेव्हा त्याचा लोंढा त्या घरावर आदळला, तरीही तो लोंढा त्या घराला हालवू शकला नाही कारण ते मजबूत बांधले होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 ते कोणाएका मनुष्यासारखे आहेत, ज्याने खोल पाया खणून आपले घर खडकावर बांधले. मग पूर आला आणि पाण्याचा लोंढा त्या घरावर जोराने आदळला; तरी त्यामुळे ते घर हलू शकले नाही, कारण ते भक्कमपणे बांधले होते. Faic an caibideil |