Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 6:47 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

47 जो कोणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो तो कोणासारखा आहे, हे मी तुम्हांला दाखवतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

47 प्रत्येकजण जो माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्या आज्ञा पाळतो तो कसा आहे हे मी तुम्हास दाखवितो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

47 जो कोणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो तो कोणासारखा आहे, हे मी तुम्हांला दाखवतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

47 असे प्रत्येकजण जे माझ्याकडे येतात आणि माझी वचने ऐकतात आणि त्याप्रमाणे वागतात, ते कशाप्रकारचे आहेत हे मी तुम्हाला दाखवितो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 6:47
30 Iomraidhean Croise  

कान द्या, माझ्याकडे या; ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल; आणि मी तुमच्याबरोबर सर्वकाळचा करार करीन, म्हणजे दाविदाला देऊ केलेले अढळ प्रसाद तुम्हांला देईन.


कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण व आई.”


तो बोलत आहे इतक्यात, पाहा, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली; आणि पाहा, मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा ‘पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे;’ ह्याचे तुम्ही ऐका.”


तेव्हा तो म्हणाला, “पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य!”


“जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी ह्यांचा आणि आपल्या जिवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही.


तो कोणाएका घर बांधणार्‍या माणसासारखा आहे. त्याने खोल खणून खडकावर पाया घातला; मग पूर आला, तेव्हा त्याचा लोंढा त्या घरावर आदळला तरी त्यामुळे ते हालले नाही; कारण ते मजबूत बांधले होते.


खडकाळीवर असलेले हे आहेत की, ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने ग्रहण करतात; पण त्यांना मूळ नसते; ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात व परीक्षेच्या वेळी माघार घेतात.


काही चांगल्या जमिनीत पडले; ते उगवून शंभरपट पीक आले.” असे सांगून तो मोठ्याने म्हणाला, “ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.”


माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो व ती माझ्यामागे येतात;


जर ह्या गोष्टी तुम्हांला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात.


माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल.


तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हांला इच्छा होत नाही.


येशू त्यांना म्हणाला, “मीच जीवनाची भाकर आहे; जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही.


पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही.


यहूदी त्याला म्हणाले, “तुम्हांला भूत लागले आहे हे आता आम्हांला कळले. अब्राहाम मेला व संदेष्टेही मेले, आणि तुम्ही म्हणता, ‘जर कोणी माझे वचन पाळील तर त्याला मरणाचा अनुभव कधीही येणार नाही.’


आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणार्‍या सर्वांचा युगानुयुगांच्या तारणाचा कर्ता झाला,


चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे.


माणसांनी नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने ‘निवडलेला व मूल्यवान’ असा जो जिवंत ‘धोंडा’ त्याच्याजवळ येत असता,


म्हणून बंधूंनो, तुम्हांला झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीही होणार नाही;


तो न्यायसंपन्न आहे हे जर तुम्हांला माहीत आहे तर जो कोणी नीतीने चालतो तो त्याच्यापासून जन्मलेला आहे हेही तुम्हांला माहीत झाले आहे.


मुलांनो, कोणी तुम्हांला बहकवू नये; जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने चालणाराही नीतिमान आहे.


आपल्याला ‘जीवनाच्या झाडावर’ अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले ‘झगे धुतात’2 ते धन्य.


Lean sinn:

Sanasan


Sanasan