Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 6:45 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

45 चांगला मनुष्य आपल्या अंत:करणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो, तसेच वाईट मनुष्य वाइटातून वाईट काढतो; कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

45 चांगला मनुष्य त्याच्या अंतःकरणात ज्या चांगल्या गोष्टी साठवलेल्या असतात त्याच काढतो आणि दुष्ट मनुष्य त्याच्या अंतःकरणात जे वाईट आहे तेच बाहेर काढतो कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

45 चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो. तसेच वाईट मनुष्य वाईट भांडारातून वाईट काढतो; कारण अंतःकरणात जे भरले आहे, ते मुखावाटे निघणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

45 कारण अंतःकरणात जे भरलेले असते तेच मुखातून बाहेर पडते. चांगला मनुष्य त्याच्या अंतःकरणात ज्या चांगल्या गोष्टी साठविलेल्या आहेत त्या बाहेर काढतो, तर दुष्ट अंतःकरणाचा मनुष्य वाईट गोष्टी बाहेर काढतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 6:45
31 Iomraidhean Croise  

गर्विष्ठ माझ्यासाठी पाश व दोर्‍या छपवून मांडतात; ते रस्त्याच्या बाजूस जाळे पसरतात; ते माझ्यासाठी सापळे लावतात. (सेला)


त्यांच्या तोंडचे पातक, त्यांच्या मुखांतील शब्द, त्यांनी उच्चारलेले शाप व लबाड्या ह्यांमुळे ते आपल्या गर्वात गुरफटून जावोत.


पाहा, ते आपल्या मुखावाटे दुष्ट उद्‍गार काढतात; त्यांच्या तोंडचे शब्द तलवारीच आहेत; कारण, “ऐकतो कोण?” असे ते म्हणतात;


कोणी असा असतो की तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे.


मनुष्य आपल्या तोंडच्या समर्पक उत्तराने आनंद पावतो; समयोचित बोल किती उत्तम!


सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंत:करणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे.


जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.”


तेव्हा पेत्र म्हणाला, “हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे?


मी जो सर्व पवित्र जनांतील लहानाहून लहान त्या माझ्यावर ही कृपा अशी झाली की, मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी;


तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरता जे चांगले तेच मात्र निघो, ह्यासाठी की, तेणेकडून ऐकणार्‍यांना कृपादान प्राप्त व्हावे.


स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा; आपल्या अंत:करणात प्रभूला गायनवादन करा;


ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो; परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा; आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा;


तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यायचे हे तुम्ही समजावे.


कारण परमेश्वर म्हणतो, त्या दिवसांनंतर इस्राएलाच्या घराण्याशी जो करार मी करीन तो हा : मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन, आणि ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन, आणि मी त्यांना देव असा होईन, आणि ते मला माझे लोक असे होतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan