Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 5:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 एके दिवशी असे झाले की, तो शिक्षण देत असताना गालीलातील प्रत्येक गावाहून आणि यहूदीया व यरुशलेम येथून आलेले परूशी व शास्त्राध्यापक तेथे बसले होते; आणि रोग बरे करण्यास प्रभूचे सामर्थ्य त्याच्या ठायी होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 असे झाले की, एके दिवशी तो शिक्षण देत असता तेथे परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते ते गालील आणि यहूदीया प्रांत व यरूशलेम शहर या भागातील कित्येक ठिकाणाहून आले होते. प्रभूचे सामर्थ्य त्याच्याठायी होते त्यामुळे तो रोग बरे करत असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 एके दिवशी तो बोध करीत असताना गालीलमधील प्रत्येक गावाहून आणि यहुदिया व यरुशलेम येथून आलेले परुशी व धर्मशास्त्राध्यापक तेथे बसले होते. रोग बरे करण्याचे सामर्थ्य येशूकडे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 एके दिवशी येशू शिक्षण देत असताना, परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक तिथे बसले होते. ते गालील आणि यहूदीया प्रांतातील प्रत्येक खेड्यातून, तसेच यरुशलेमातूनही आले होते. आजारी लोकांना निरोगी करण्याचे प्रभूचे सामर्थ्य येशूंच्या ठायी होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 5:17
20 Iomraidhean Croise  

‘आंधळे पाहतात,’ पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व ‘गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते’;


मग यरुशलेमेहून परूशी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, “आपले शिष्य वाडवडिलांचा संप्रदाय का मोडतात?


पण त्याने तेथून जाऊन घोषणा करून करून त्या गोष्टीला इतकी प्रसिद्धी दिली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना; म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला; तरी लोक चहूकडून त्याच्याकडे आलेच.


सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही; त्यांनी दुखणाइतांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील.”


तसेच यरुशलेमेहून आलेले शास्त्री म्हणत होते की, “त्याला बालजबूल लागला आहे व तो त्या भुतांच्या अधिकार्‍याच्या साहाय्याने भुते काढतो.”


आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठायी लगेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, “माझ्या वस्त्रांना कोण शिवले?”


तेव्हा परूशी व यरुशलेमेहून आलेले कित्येक शास्त्री एकत्र जमून त्याच्याकडे आले.


तेव्हा परूशी व शास्त्रीही अशी कुरकुर करू लागले की, “हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो.”


मग असे झाले की, तीन दिवसांनंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांना प्रश्‍न करताना सापडला.


तेव्हा शास्त्री व परूशी असा वादविवाद करून म्हणाले की, “हा दुर्भाषण करणारा कोण आहे? केवळ देवावाचून पापांची क्षमा कोण करू शकतो?”


तेव्हा परूशी व त्यांच्यातील शास्त्री हे त्याच्या शिष्यांविरुद्ध कुरकुर करत त्यांना म्हणाले, “जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर तुम्ही का खातापिता?”


तेव्हा सर्व समुदायांची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती, कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांना निरोगी करत होते.


परंतु परूशी व शास्त्री ह्यांनी आपणासंबंधाने असलेला देवाचा संकल्प व्यर्थ केला, कारण त्यांनी त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला नव्हता.


पण येशू म्हणाला, “कोणीतरी मला स्पर्श केलाच, कारण माझ्यातून शक्ती निघाली हे मला समजले आहे.”


येशूने त्याला उत्तर दिले, “तुम्ही इस्राएलाचे गुरू असूनही तुम्हांला ह्या गोष्टी समजत नाहीत काय?


परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो ह्यासाठी की, आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे.”


देवाने पौलाच्या हातून असाधारण चमत्कारही घडवले;


आणि बरे करण्याकरता तू आपला हात लांब करत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर; तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या नावाने चिन्हे व अद्भुते घडावीत असेही कर.”


परंतु सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमलियेल नावाचा एक परूशी शास्त्राध्यापक होता; त्याने न्यायसभेत उभे राहून त्या माणसांना थोडा वेळ बाहेर पाठवण्यास सांगितले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan