Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 5:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 पुढे असे झाले की, तो एका गावात असता पाहा, तेथे कुष्ठरोगाने भरलेला असा एक माणूस होता; त्याने येशूला पाहून पालथे पडून त्याला विनंती केली की, “प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 आणि असे झाले की, येशू कोणाएका गावात असता तेथे कुष्ठाने भरलेला एक मनुष्य होता, जेव्हा त्याने येशूला पाहिले तेव्हा तो पालथा पडला आणि त्यास विनंती केली, “प्रभूजी, जर तुमची इच्छा असेल तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 एकदा येशू एका गावी असता तेथे कुष्ठरोगाने भरलेला एक माणूस होता. त्याने येशूला पाहून पालथे पडून विनंती केली, “प्रभो, आपली इच्छा असली, तर मला बरे करायला आपण समर्थ आहात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 येशू एका गावात असता एक कुष्ठरोगाने भरलेला मनुष्य तिथे आला. त्याने येशूंना पाहिले, तेव्हा त्यांच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “प्रभू, जर तुमची इच्छा असेल, तर मला शुद्ध करण्यास तुम्ही समर्थ आहात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 5:12
27 Iomraidhean Croise  

परमेश्वराला काही असाध्य आहे काय? नेमलेल्या समयी वसंत ऋतूत मी तुझ्याकडे परत येईन तेव्हा सारेला मुलगा होईल.”


हे पाहून सर्व लोक पालथे पडून म्हणाले, “परमेश्वर हाच देव! परमेश्वर हाच देव!”


अरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धन्याच्या पदरी एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता; कारण त्याच्या द्वारे परमेश्वराने अरामास जय दिला होता. तो पराक्रमी वीर होता, पण कोडी होता.


तर नामानाचे कोड तुला व तुझ्या संतानाला निरंतर लागून राहील.” तेव्हा तो बर्फासारखा पांढरा कोडी होऊन त्याच्यापुढून चालता झाला.


त्या वेळी वेशीच्या बाहेर चार कोडी माणसे होती. ती एकमेकांना म्हणाली, “येथे बसून का मरावे?


दाविदाने वर दृष्टी केली तो परमेश्वराचा दूत आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन यरुशलेमावर उगारून आकाश व पृथ्वी ह्यांच्यामध्ये उभा आहे असे त्याला दिसले, तेव्हा दावीद व वडील जन ह्यांनी दंडवत घातले; त्या वेळी त्यांनी गोणपाट नेसले होते.


आणि संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील.“


तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याजवळ राहीन; मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन;


परमेश्वराने त्याला आणखी सांगितले, “आता आपला हात छातीवर ठेव.” त्याने हात छातीवर ठेवून बाजूला काढला तेव्हा तो कोडाने बर्फासारखा पांढरा झाला.


पण ते कोवळे मांस फिरून पांढरे झाले तर त्याने पुन्हा याजकाकडे यावे;


आणि परमेश्वराच्या समोरून अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी ही भस्म केली; हे पाहून सर्व लोकांनी जयजयकार केला व दंडवत घातले.


तेव्हा येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोन ह्याच्या घरी असता,


तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्याजवळ आले; तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “हे करण्यास मी समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरता काय?” ते त्याला म्हणाले, “होय, प्रभू.”


त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली की, “माझी लहान मुलगी मरायला टेकली आहे; तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा.”


आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणांवर पालथा पडला; हा तर शोमरोनी होता.


तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श करून म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” आणि लगेचच त्याचे कुष्ठ गेले.


महारोगाच्या व्याधीसंबंधाने सांभाळा; लेवीय याजक तुम्हांला जे शिकवतील ते अगदी काळजीपूर्वक पाळा; मी त्यांना आज्ञा केली आहे त्याप्रमाणे काळजीपूर्वक पाळा.


ह्यामुळे ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणार्‍यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे.


तो म्हणाला, “नाही; मी येथे परमेश्वराचा सेनापती ह्या नात्याने आलो आहे.” तेव्हा यहोशवाने त्याला दंडवत घालून म्हटले, “स्वामींची आपल्या दासाला काय आज्ञा आहे?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan