Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 4:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 तेव्हा येशू त्याला धमकावून म्हणाला, “गप्प राहा व ह्याच्यातून नीघ.” मग भूत त्या मनुष्याला त्यांच्यामध्ये खाली आपटून काही उपद्रव न करता त्याच्यातून निघाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 येशूने त्यास धमकावून म्हटले, “शांत राहा आणि त्याच्यातून नीघ!” तेव्हा त्या अशुद्ध आत्म्याने त्या मनुष्यास जमिनीवर खाली पाडले व त्या मनुष्यास काहीही इजा न करता तो त्याच्यातून बाहेर निघाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

35 येशूने त्याला दटावले, “गप्प राहा व ह्याच्यातून निघून जा.” तेव्हा भूत त्या मनुष्याला त्यांच्यासमोर खाली आपटून काही उपद्रव न करता त्याच्यातून निघून गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 “गप्प राहा!” येशूंनी धमकाविले, “यातून बाहेर ये!” मग त्या भुताने त्या मनुष्याला सर्वांसमोर खाली पाडले आणि त्याला काहीही उपद्रव न करता तो निघून गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 4:35
17 Iomraidhean Croise  

दुर्जनाला तर देव म्हणतो : “माझे नियम विदित करणारा तू कोण? माझा करार आपल्या मुखाने उच्चारणारा तू कोण?


मग परमेश्वर सैतानास म्हणाला, “अरे सैताना, परमेश्वर तुला धमकी देवो; यरुशलेम आपलीशी करणारा परमेश्वर तुला धमकी देवो; हा अग्नीतून काढलेले कोलीत नव्हे काय?”


नंतर येशूने भुताला दटावले, तेव्हा ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला.


तो त्यांना म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरलात?” मग उठून त्याने वारे व समुद्र ह्यांना धमकावले आणि अगदी निवांत झाले.


तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला व त्याच्यातून निघून गेला.


तेव्हा त्याने उठून वार्‍याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, “उगा राहा, शांत हो.” मग वारा पडला व अगदी निवांत झाले.


तेव्हा तो आत्मा ओरडून व त्याला फारच पिळून निघाला, आणि तो मेल्यासारखा झाला म्हणून तो मेला आहे असेच बहुतेक म्हणाले.


परंतु त्याच्यापेक्षा अधिक बलवान मनुष्य त्याच्यावर येऊन त्याला जिंकतो, तेव्हा ज्या शस्त्रसामुग्रीवर त्याने भिस्त ठेवली होती ती तो घेऊन जातो व त्याची लूट वाटून टाकतो.


त्याने त्यांना म्हटले, “खरोखर तुम्ही मला ही म्हण लागू कराल की, ‘हे वैद्या, तू स्वतःलाच बरे कर; कफर्णहूमात ज्या गोष्टी तू केल्यास असे आम्ही ऐकले त्या येथेही आपल्या गावी कर.”’


तेव्हा त्याने तिच्यावर ओणवून तापाला दटावले, तेव्हा तिचा ताप निघाला व लगेच ती उठून त्यांची सेवा करू लागली.


“तू ख्रिस्त, देवाचा पुत्र आहेस,” असे ओरडत भुतेदेखील पुष्कळ माणसांतून निघाली; परंतु त्याने त्यांना धमकावले व बोलू दिले नाही; कारण तो ख्रिस्त आहे हे त्यांना ठाऊक होते.


तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, “गुरूजी, गुरूजी, आपण बुडालो!” तेव्हा त्याने उठून वार्‍यास व पाण्याच्या कल्लोळास धमकावले, आणि ते बंद होऊन निवांत झाले.


आणि पाहा, कोणीएक आत्मा त्याला धरतो, आणि हा एकाएकी ओरडतो; मग तो ह्याला असा पिळतो की ह्याला फेस येतो; तो ह्याला पुष्कळ ठेचतो व ह्याला सोडता सोडत नाही.


तो जवळ येत आहे इतक्यात भुताने त्याला आपटले व पिळून टाकले, पण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला धमकावले; आणि मुलाला बरे करून त्याच्या बापाजवळ परत दिले.


म्हणून ‘स्वर्गांनो’ व त्यांत राहणार्‍यांनो, ‘उल्लास करा!’ पृथ्वी व समुद्र ह्यांत राहणार्‍यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुमच्याकडे आला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan