Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 4:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 “अरे येशू नासरेथकरा! ‘तू आमच्यामध्ये का पडतोस?’ तू आमचा नाश करण्यास आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र (पुरुष) तो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 हे नासरेथकर येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करण्यासाठी आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे! देवाचा पवित्र! तो तूच आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

34 “आम्ही आमचे पाहून घेऊ! अरे नासरेथकर येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करायला आला आहेस काय? तू कोण आहेस, हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र तो तू आहेस!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 “नासरेथकर येशू येथून निघून जा! तुम्हाला आमच्याशी काय काम? आमचा नाश करावयास आले आहात काय? तुम्ही कोण आहात हे मला माहीत आहे—परमेश्वराचा पवित्रजन!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 4:34
22 Iomraidhean Croise  

आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडशील.”


तेव्हा ती एलीयाला म्हणाली, “हे देवाच्या माणसा, तुमचा माझा काय संबंध? माझ्या पातकांचे मला स्मरण द्यावे व माझ्या मुलाला मारून टाकावे म्हणून तुम्ही माझ्या घरी आला आहात का?”


कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस; तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस;


आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकांचा अंत करावा, अधर्माबद्दल प्रायश्‍चित्त करावे, सनातन नीतिमत्ता उदयास आणावी, दृष्टान्त व संदेश मुद्रित करावेत आणि जो परमपवित्र त्याला अभिषेक करावा, हे घडून येण्यासाठी तुझे लोक व तुझे पवित्र नगर ह्यासंबंधाने सत्तर सप्तके ठरली आहेत.


तेव्हा पाहा, ते ओरडून म्हणाले, “हे येशू, देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हांला पिडण्यास येथे आला आहेस काय?”


तो ओरडून म्हणाला, “हे येशू नासरेथकरा, तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश करायला आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र तो तूच!”


तेव्हा नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले व अनेक भुते काढली; त्या भुतांनी त्याला ओळखले म्हणून त्याने त्यांना बोलू दिले नाही.


आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, ‘तू मध्ये का पडतोस?’ मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस.”


देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील; म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील.


तेव्हा अशुद्ध भुताच्या आत्म्याने पछाडलेला कोणीएक माणूस सभास्थानात होता; तो मोठ्याने ओरडून म्हणाला,


“तू ख्रिस्त, देवाचा पुत्र आहेस,” असे ओरडत भुतेदेखील पुष्कळ माणसांतून निघाली; परंतु त्याने त्यांना धमकावले व बोलू दिले नाही; कारण तो ख्रिस्त आहे हे त्यांना ठाऊक होते.


तो येशूला पाहून ओरडला व त्याच्यापुढे पडून मोठ्याने म्हणाला, “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, ‘तू मध्ये का पडतोस?’ मी तुला विनंती करतो, मला पीडा देऊ नकोस.”


तेव्हा गरसेकरांच्या चहूकडल्या प्रांतांतील सर्व लोकांनी त्याला आपल्या येथून निघून जाण्याची विनंती केली; कारण ते फार घाबरले होते. मग तो मचव्यात बसून परत जाण्यास निघाला.


मग त्यांनी येऊन त्यांची समजूत घातली; आणि त्यांना बाहेर आणून नगरातून निघून जाण्याची विनंती केली.


कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस, व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.


जो पवित्र व नीतिमान त्याला तुम्ही नाकारले, आणि ‘खुनी पुरुष आम्हांला द्या’ अशी मागणी केली.


कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केलास तो तुझा पवित्र ‘सेवक’ येशू ह्याच्या विरुद्ध ह्या शहरात परराष्ट्रीय व इस्राएल लोक ह्यांच्यासह हेरोद व पंतय पिलात हे एकत्र झाले;


ज्या अर्थी ‘मुले’ एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा की, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे,


एकच देव आहे, असा विश्वास तू धरतोस काय? ते बरे करतोस; भुतेही तसाच विश्वास धरतात व थरथर कापतात.


पाप करणारा सैतानाचा आहे; कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला.


त्याने ‘दियाबल’ व ‘सैतान’ म्हटलेला जुनाट ‘साप’ म्हणजे तो अजगर ह्याला धरले, आणि त्याने एक हजार वर्षेपर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग डोहात टाकून दिले;


फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही : ‘जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्याजवळ ‘दाविदाची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही,’ तो असे म्हणतो :


Lean sinn:

Sanasan


Sanasan