Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 3:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आताच झाडांच्या मुळांशी कुर्‍हाड ठेवलेली आहे; जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकले जाते.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 आताच झाडांच्या मुळांशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. म्हणून प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 आताच तर झाडाच्या मुळावर कुऱ्हाड उचललेली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही, ते ते तोडून अग्नीत टाकले जाईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 कुर्‍हाड आधीच झाडांच्या मुळावर ठेवलेली आहे आणि प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडले जाईल आणि अग्नीत टाकण्यात येईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 3:9
14 Iomraidhean Croise  

तू वैभवाने व मोठेपणाने एदेनातल्या वृक्षांपैकी कोणाच्या तोडीचा आहेस? तुला तर एदेनातल्या वृक्षांसह अधोलोकी लोटतील आणि तलवारीने ठार झालेल्यांसह बेसुंत्यांमध्ये तू पडून राहशील. फारो व त्याचा लोकसमूह ह्यांची अशी गती होईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


तो मोठ्याने पुकारून म्हणाला, ‘हा वृक्ष तोडून टाका, ह्याच्या फांद्या छेदा, ह्याची पाने झाडून टाका व ह्याची फळे विखरा; ह्याच्याखाली राहत असलेले पशू निघून जावोत व पक्षी ह्याच्या शाखांतून उडून जावोत.


आणि महाराजांनी असे पाहिले की, एक जागल्या, पवित्र पुरुष, आकाशातून उतरून म्हणाला, हा वृक्ष तोडून ह्याचा नाश करा; तथापि ह्याचे बुंध जमिनीत राहू द्या; ह्याला लोखंड व पितळ ह्यांच्या पट्ट्याने बांधून रानातल्या कोवळ्या गवतात राहू द्या; ह्याला आकाशातल्या दहिवराने भिजू द्या; ह्याला वनपशूंबरोबर वाटा मिळो, ह्याच्यावरून सात काळ जावोत तोवर असे होवो.


आणि आताच तर झाडांच्या मुळाशी कुर्‍हाड ठेवलेली आहे; जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकले जाते.


ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते.


त्याने हा दाखला सांगितला, “कोणाएकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते; त्यावर तो फळ पाहण्यास आला, परंतु त्याला काही आढळले नाही.


तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, ‘पाहा, गेली तीन वर्षे मी ह्या अंजिरावर फळ पाहण्यास येत आहे; परंतु मला काही आढळत नाही; ते तोडून टाक; उगाच त्याने जागा तरी का अडवावी?’


मग पुढील वर्षी त्याला फळ आले तर बरे; नाहीतर आपण ते तोडून टाकावे.”’


कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो; आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात.


मोशेच्या नियमशास्त्राचा कोणी भंग केला तर त्याच्यावर दया न होता ‘त्याला दोघांच्या किंवा तिघांच्या साक्षीवरून मरणदंड होतो.’


कारण आपला ‘देव भस्म करणारा अग्नी आहे.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan