Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 3:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 प्रत्येक खोरे भरेल, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होईल, वाकडी सरळ होतील, खडकाळीच्या वाटा सपाट होतील,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 प्रत्येक दरी भरली जाईल, आणि प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट केली जाईल, वांकडी सरळ होतील, आणि खडबडीत मार्ग सपाट केले जातील

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 प्रत्येक दरी भरली जाईल. प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट केली जाईल. वळणावळणाचे रस्ते सरळ केले जातील. खडबडीत वाटा समतल केल्या जातील

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 प्रत्येक दरी भरून जाईल, प्रत्येक डोंगर आणि टेकडी समान होतील, वाकड्या वाटा सरळ होतील, खडतर रस्ते सुरळीत होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 3:5
11 Iomraidhean Croise  

प्रत्येक खोरे उंच होवो, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होवो; उंचसखल असेल ते सपाट होवो व खडकाळीचे मैदान होवो;


माहीत नाही अशा रस्त्याने मी आंधळ्यांना नेईन; अज्ञात अशा मार्गांनी मी त्यांना चालवीन; त्यांच्यापुढे अंधकार प्रकाश होईल व उंचसखल जागा सपाट मैदान होईल असे करीन. ह्या गोष्टी मी करणार, सोडणार नाही.


“परमेश्वर त्याला म्हणतो, मी तुझ्यापुढे चालेन व उंचसखल असलेले सपाट करीन; मी पितळी दरवाजे फोडून त्यांचे तुकडे करीन, लोखंडाचे अडसर मोडून टाकीन.


मी आपले सर्व पर्वत धोपट मार्ग करीन, माझे राजमार्ग उंच होतील.


वनांतील सर्व वृक्षांना कळेल की मी परमेश्वराने उंच वृक्षास नीच केले आहे व नीच वृक्षास उंच केले आहे, आणि हिरव्या झाडास सुकवले आहे व शुष्क झाडास फलद्रूप केले आहे; मी परमेश्वर हे बोललो आहे व मी हे केलेही आहे.”


दीन स्थितीतील बंधूने आपल्या उच्च स्थितीविषयी अभिमान बाळगावा,


Lean sinn:

Sanasan


Sanasan