Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 3:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तो त्यांना उत्तर देई, “ज्याच्याजवळ दोन अंगरखे आहेत त्याने, ज्याला नाही त्याला एक द्यावा, आणि ज्याच्याजवळ अन्न आहे त्याने त्याप्रमाणेच करावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 त्याने उत्तर दिले, “ज्याच्याकडे दोन अंगरखे असतील त्याने ज्याला नाही त्यास एक द्यावा आणि ज्याच्याकडे अन्न आहे त्यानेही तसेच करावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 तो त्यांना उत्तर देत असे, “ज्याच्याजवळ दोन सदरे आहेत, त्याने ज्याच्याकडे काहीच नाही त्याला एक द्यावा आणि ज्याच्याजवळ अन्न आहे, त्याने त्यात दुसऱ्यांना सहभागी करावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 यावर योहानाने उत्तर दिले, “तुमच्याजवळ दोन अंगरखे असतील, तर ज्याच्याजवळ एकही नाही त्याला द्यावा, तुमच्याजवळ अन्न असेल, तर त्यांनीही तसेच करावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 3:11
22 Iomraidhean Croise  

कोणावर जुलूम करत नाही, कर्जदाराचे गहाण त्याला परत करतो, कोणाला लुटत नाही, भुकेल्यास अन्न देतो व उघड्यास वस्त्र लेववतो,


म्हणून महाराज, माझी मसलत आपण मान्य करावी; आपण पाप सोडून न्यायनीतीचे आचरण करावे; अधर्म सोडून गरिबांवर दया करावी; अशाने कदाचित आपले स्वास्थ्य अधिक काळ राहील.”


तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खचीत सांगतो की, ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे.’


तर जे आत आहे त्याचा2 दानधर्म करा म्हणजे पाहा, सर्व तुम्हांला शुद्ध आहे.


हे ऐकून येशूने त्याला म्हटले, “अद्यापि तुझ्यात एक गोष्ट उणी आहे; तुझे असेलनसेल ते विकून गोरगरिबांना वाटून टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल; आणि चल, माझ्यामागे ये.”


तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभूजी, पाहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यांस देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो.”


कारण यहूदाजवळ डबी होती म्हणून सणासाठी आपणास ज्या पदार्थांची गरज आहे ते विकत घ्यावेत किंवा गरिबांना काहीतरी द्यावे म्हणून येशू सांगतो आहे, असे कित्येकांना वाटले.


तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, लोकांना फार दानधर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता.


‘कर्नेल्या, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि देवासमोर तुझ्या दानधर्माचे स्मरण करण्यात आले आहे.


तेव्हा तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, “काय महाराज?” त्याने त्याला म्हटले, “तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहेत.


चोरी करणार्‍याने पुन्हा चोरी करू नये; तर त्यापेक्षा गरजवंताला देण्यास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करत राहावे.


प्रस्तुत युगातल्या धनवानांना निक्षून सांग की, तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणांस उपभोगासाठी सर्वकाही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी.


चांगले ते करावे; सत्कर्माविषयी धनवान असावे; परोपकारी व दानशूर असावे;


कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.


देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटांत समाचार घेणे, व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे.


माझ्या बंधूंनो, माझ्या ठायी विश्वास आहे, असे कोणी म्हणत असून तो क्रिया करत नाही तर त्यापासून काय लाभ? तो विश्वास त्याला तारण्यास समर्थ आहे काय?


मग जवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वत:ला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्या ठायी देवाची प्रीती कशी राहणार?


“मी देवावर प्रीती करतो,” असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे; कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan