Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 24:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तो येथे नाही, तर उठला आहे; तो गालीलात होता तेव्हाच त्याने तुम्हांला काय सांगितले ह्याची आठवण करा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तो येथे नाही; तो उठला आहे! तो गालील प्रांतात असताना त्याने तुम्हास काय सांगितले याची आठवण करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 तो येथे नाही, तर तो उठला आहे. तो गालीलात होता तेव्हा त्याने तुम्हांला काय सांगितले होते, ते आठवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 ते येथे नाही, ते पुन्हा उठले आहेत! गालीलात असताना त्यांनी तुम्हाला काय सांगितले होते याची आठवण करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 24:6
19 Iomraidhean Croise  

कारण जसा ‘योना तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता’ तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील.


तेव्हापासून येशू आपल्या शिष्यांना सांगू लागला की, “मी यरुशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जिवे मारले जावे व तिसर्‍या दिवशी उठवले जावे ह्याचे अगत्य आहे.”


“महाराज, तो ठक जिवंत असता ‘तीन दिवसांनंतर मी उठेन’ असे म्हणाला होता, ह्याची आम्हांला आठवण आहे.


तो येथे नाही; कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या, प्रभू निजला होता ते हे स्थळ पाहा.


तो त्यांना म्हणाला, “चकित होऊ नका; वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेथकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे, तो येथे नाही; त्याला ठेवले होते ती ही जागा पाहा.


तो त्यांना असे शिक्षण देऊ लागला की, ‘मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, जिवे मारले जावे आणि त्याने तीन दिवसांनंतर पुन्हा उठावे, ह्याचे अगत्य आहे.’


ते म्हणत होते की, “प्रभू खरोखर उठला आहे व शिमोनाच्या दृष्टीस पडला.”


तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, “तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यांमध्ये का करता?


आणि म्हटले, “मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दु:खे भोगावी, वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, जिवे मारले जावे, आणि तिसर्‍या दिवशी पुन्हा उठवले जावे, ह्याचे अगत्य आहे.”


“तुम्ही ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा; कारण मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येणार आहे.”


त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले; कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते.


मी तुमच्याबरोबर असताना हे तुम्हांला सांगत असे ह्याची तुम्हांला आठवण नाही काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan