Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 23:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तरी ते अधिकच आग्रह धरून म्हणाले, “ह्याने गालीलापासून आरंभ करून येथपर्यंत सार्‍या यहूदीयात शिक्षण देऊन लोकांना चिथवले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 पण त्यांनी आग्रह धरला. ते म्हणाले, “यहूदीया प्रांतातील सर्व लोकांस तो आपल्या शिकवणीने चिथावित आहे, त्याने गालील प्रांतापासून सुरुवात केली आणि येथपर्यंत आला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 परंतु हे ऐकून ते अधिकच उग्र आविर्भावाने म्हणाले, “ह्याने गालीलपासून आरंभ करून येथपर्यंत साऱ्या यहुदियात शिक्षण देत लोकांना चिथवले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तेव्हा ते अधिकच आग्रह करून म्हणाले, “पण हा मनुष्य सर्व यहूदीया प्रांतातील लोकांस त्याच्या शिकवणीद्वारे भडकावित आहे आणि गालीलापासून सुरुवात करून तो येथे आला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 23:5
24 Iomraidhean Croise  

कुत्र्यांनी मला वेढले आहे; दुर्जनांच्या टोळीने मला घेरले आहे; त्यांनी माझे हातपाय विंधले आहेत.


माझा जीव सिंहांमध्ये पडला आहे; ज्यांचे दात केवळ भाले व बाण आहेत, ज्यांची जीभ तीक्ष्ण तलवारच आहे, अशा जाज्वल्य मनुष्यांमध्येदेखील मी पडून राहीन.


विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्याच्या केसांपेक्षा अधिक आहेत; अन्यायाने माझ्याशी वैर करणारे, माझा जीव घेऊ पाहणारे, बलिष्ठ आहेत; मी हरण केले नव्हते तेही मला द्यावे लागले.


मग असे झाले की, येशूने आपल्या बारा शिष्यांना आज्ञा सांगण्याचे समाप्त केल्यावर तो तेथून त्यांच्या नगरांत शिकवण्यास व उपदेश करण्यास गेला.


हेरोद राजाच्या काळात यहूदीयातील बेथलेहेमात येशूच्या जन्मानंतर, पाहा, पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की,


ह्यावरून आपले काहीच चालत नाही, उलट अधिकच गडबड होत आहे असे पाहून पिलाताने पाणी घेऊन लोकसमुदायासमोर हात धुऊन म्हटले, “मी ह्या [नीतिमान] मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, तुमचे तुम्हीच पाहा.”


नंतर येशू यहूदी लोकांच्या सभास्थानांत सुवार्तेची घोषणा करत व राज्याची सुवार्ता गाजवत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करत गालीलभर फिरला.


योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाच्या [राज्याची] सुवार्ता गाजवत गालीलात आला व म्हणाला,


तो तेथून बाहेर आल्यावर शास्त्री व परूशी त्याच्या अंगावर त्वेषाने येऊन त्याने पुष्कळशा गोष्टींविषयी बोलावे म्हणून त्याला डिवचू लागले;


पण ‘ह्याला वधस्तंभावर खिळाच’ असा त्यांनी मोठ्याने ओरडून आग्रह चालवला; आणि त्यांच्या व मुख्य याजकांच्या ओरडण्याला यश आले.


तेव्हा पिलाताने हे ऐकून “हा मनुष्य गालीली आहे काय?” असे विचारले.


दुसर्‍या दिवशी त्याने गालीलात जाण्याचा बेत केला, तेव्हा फिलिप्प त्याला भेटला; येशूने त्याला म्हटले, “माझ्या-मागून ये.”


ह्यावरून ते ओरडले, “त्याची वाट लावा, त्याची वाट लावा, त्याला वधस्तंभावर खिळा!” पिलात त्यांना म्हणाला, “मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळावे काय?” मुख्य याजकांनी उत्तर दिले, “कैसरावाचून आम्हांला कोणी राजा नाही.”


येशूने गालीलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपला गौरव प्रकट केला आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.


कित्येक म्हणाले, “हा ख्रिस्त आहे.” दुसरे कित्येक म्हणाले, “ख्रिस्त गालीलातून येतो काय?


त्यांनी त्याला उत्तर दिले, “तुम्हीही गालीलातले आहात काय? शोध करून पाहा, की गालीलातून कोणी संदेष्टा उद्भवत नाही.”


योहानाने बाप्तिस्म्याची घोषणा केल्यानंतर गालीलापासून प्रारंभ होऊन सर्व यहूदीयामध्ये घडलेली गोष्ट तुम्हांला तर माहीतच आहे.


असे त्यांच्यात जोराचे भांडण चालले असता ते पौलाला फाडून टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकूम केला की, खाली जाऊन त्याला त्यांच्यामधून सोडवून गढीत आणावे.


हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांना जिवे मारण्याचा विचार करू लागले.


त्याचे हे भाषण ऐकणार्‍यांच्या अंतःकरणास इतके झोंबले की ते त्याच्यावर दातओठ खाऊ लागले.


तेव्हा ते मोठ्याने ओरडून व कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan