Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 22:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तेव्हा त्याने पेत्र व योहान ह्यांना असे सांगून पाठवले की, “आपण वल्हांडण सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तेव्हा त्याने पेत्र व योहान यांना सांगून पाठवले की, “जा आणि आपणासाठी वल्हांडण सणाचे भोजन तयार करा म्हणजे आपण ते खाऊ.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 येशूने पेत्र व योहान ह्यांना असे सांगून पाठवले, “आपण ओलांडण सणाचे भोजन करावे म्हणून तुम्ही जाऊन आपल्यासाठी तयारी करा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 येशूंनी पेत्र आणि योहान यांना पुढे पाठविले व म्हणाले, “जा आणि आपल्यासाठी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी करा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 22:8
12 Iomraidhean Croise  

येशूने त्याला उत्तर दिले, “आता हे होऊ दे; कारण ह्या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणांला उचित आहे.” तेव्हा त्याने तसे होऊ दिले.


ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती.


ते त्याला म्हणाले, “आम्ही त्याची तयारी कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे?”


पेत्र व योहान हे तिसर्‍या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते.


मग तो बरा झालेला पांगळा पेत्र व योहान ह्यांना बिलगून राहिला असता सर्व लोक आश्‍चर्यचकित होऊन त्यांच्याकडे शलमोनाची देवडी नावाच्या ठिकाणी धावत आले.


पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली.


तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्‍चर्य करू लागले; आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले.


परंतु पेत्र व योहान ह्यांनी त्यांना उत्तर दिले की, “देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा;


मग शोमरोनाने देवाचे वचन स्वीकारले असे यरुशलेमेतल्या प्रेषितांनी ऐकून त्यांच्याकडे पेत्र व योहान ह्यांना पाठवले;


आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानलेले होते, त्यांनी माझ्याबरोबर व बर्णबाबरोबर उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे व त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan