Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 22:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तो मुख्य याजक व सरदार ह्यांच्याकडे निघून गेला आणि त्यांच्या हाती त्याला कसे धरून द्यावे ह्याविषयी त्याने त्यांच्याशी बोलणे केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 यहूदा मुख्य याजक लोक व परमेश्वराच्या भवनाचे अधिकारी यांच्याकडे गेला आणि त्यांच्या हाती येशूला कसे धरुन देता येईल याविषयीची बोलणी केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 तो मुख्य याजक व मंदिराच्या रक्षकांचे अधिकारी ह्यांच्याकडे निघून गेला आणि त्यांच्या हाती येशूला कसे धरून द्यावे, ह्याविषयी त्याने त्यांच्याशी मसलत केली

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तो प्रमुख याजकवर्ग आणि मंदिराचे सुरक्षा अधिकाऱ्यांकडे गेला आणि येशूंना विश्वासघाताने कसे धरून देता येईल, याविषयी त्याने त्यांच्याशी चर्चा केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 22:4
9 Iomraidhean Croise  

आणि अजर्‍या बिन हिल्कीया, बिन मशुल्लाम, बिन सादोक, बिन मरायोथ, बिन अहीटूब; हा देवाच्या मंदिराचा शास्ता होता;


सराया बिन हिल्कीया बिन मशुल्लाम बिन सादोक बिन मरायोथ बिन अहीटूब हा देवमंदिराचा अधिकारी होता;


तेव्हा यहूदा इस्कर्योत नावाच्या बारा जणांतील एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले,


तेव्हा त्यांना आनंद झाला व त्यांनी त्याला पैसा देण्याचा करार केला.


जे मुख्य याजक, मंदिराचे सरदार व वडील त्याच्यावर चालून आले होते त्यांना येशू म्हणाला, “जसे लुटारूवर जावे तसे तुम्ही तलवारी व सोटे घेऊन निघालात काय?


ते लोकांबरोबर बोलत असता त्यांच्यावर याजक, मंदिराचा सरदार व सदूकी हे चालून आले;


हे वर्तमान ऐकून ह्याचा काय परिणाम होईल ह्याविषयी मंदिराचा सरदार व मुख्य याजक घोटाळ्यात पडले.


तेव्हा सरदाराने शिपायांसह जाऊन त्यांना जुलूम न करता आणले; कारण लोक आपणाला दगडमार करतील असे त्यांना भय वाटत होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan