Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 21:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुमच्यावर ‘पाशाप्रमाणे’ अकस्मात येईल;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 परंतु तुम्ही स्वतःला सांभाळा, दारुबाजी आणि अधाशीपणा व या हल्लीच्या जीवनासंबंधीच्या चिंता यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊ नये, तो दिवस पाशासारखा अकस्मात तुमच्यावर येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

34 तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित चैनबाजी, दारुबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हांला अकस्मात गाठील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 “सावध राहा! नाही तर तुमची अंतःकरणे दारुबाजी, मद्यपान आणि जीवनातील चिंता यामुळे निराश होतील आणि तो दिवस तुम्हावर अकस्मात एखाद्या पाशासारखा येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 21:34
37 Iomraidhean Croise  

तर चल, आपण आपल्या बापाला द्राक्षारस पाजू आणि त्याच्यापाशी निजू; अशा प्रकारे आपण आपल्या बापाचा वंश चालवू.”


त्या रात्रीही त्यांनी बापाला द्राक्षारस पाजला आणि धाकटी उठून जाऊन त्याच्यापाशी निजली; पण ती केव्हा निजली व केव्हा उठली हे त्याला कळले नाही.


तेव्हा त्याने जाऊन ती आईकडे आणली, आणि त्याच्या आईने त्याच्या बापाच्या आवडीचे पक्वान्न तयार केले.


त्याच्यावर नकळत आपत्ती येवो; जो फासा त्याने गुप्तपणे मांडला त्यात तोच गुंतून पडो; तो त्यात अचानक नाश पावो.


चढेल दृष्टी व गर्विष्ठ अंत:करण, तसाच दुर्जनांच्या शेताचा उपज ही पापरूप होत.


मद्यपी व मांसाचे अतिभक्षण करणारे ह्यांच्या वार्‍यास उभा राहू नकोस;


कारण मनुष्याला स्वतःवर येणारा प्रसंग कळत नाही; अपायकारक जाळ्यात सापडणार्‍या माशांप्रमाणे, पाशात अडकणार्‍या पक्ष्यांप्रमाणे, मानवपुत्रांवर अनिष्ट कालपाश अकस्मात पडतो; त्यात ते सापडतात.


हेही द्राक्षारसाने भेलकांडत आहेत, मद्याने झुकांड्या खात आहेत; याजक व संदेष्टा हे मद्याने भेलकंडत आहेत, द्राक्षारसाने गुंग झाले आहेत, मद्याने झुकांड्या खात आहेत; ते दृष्टान्त पाहताना भेलकंडतात, निर्णय सांगताना झोके खातात.


जारकर्म, द्राक्षारस व नवा द्राक्षारस विवेक नष्ट करतात.


“जेव्हा जेव्हा तुम्ही, म्हणजे तू व तुझे मुलगे दर्शनमंडपात जाणार असाल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षारस अथवा मद्य पिऊ नये; प्याल तर मराल; हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय;


काटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो.


तुम्ही आपणांला सांभाळा; कारण ते तुम्हांला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, सभास्थानांमध्ये तुम्हांला मार देतील आणि सुभेदार व राजे ह्यांच्यापुढे तुम्ही साक्ष द्यावी म्हणून तुम्हांला माझ्याकरता त्यांच्यासमोर उभे राहावे लागेल.


व नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते.


प्रभूने तिला उत्तर दिले, “मार्थे, मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस;


तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हांला वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.”


तुम्ही स्वत: सांभाळा. तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव आणि त्याने पश्‍चात्ताप केला तर त्याला क्षमा कर.


कारण तो अवघ्या ‘पृथ्वीच्या’ पाठीवर ‘राहणार्‍या’ सर्व ‘लोकांवर’ त्याप्रमाणे येईल.


तो म्हणाला, “तुम्हांला कोणी बहकवू नये म्हणून सावध राहा; कारण माझ्या नावाने पुष्कळ लोक येऊन ‘मीच तो आहे’ आणि ‘तो काळ जवळ आला आहे,’ असे म्हणतील; त्यांच्या नादी लागू नका.


काटेरी झाडांमध्ये पडलेले हे आहेत की, ते ऐकतात, आणि संसाराच्या चिंता, धन व विषयसुख ह्यांत आयुष्यक्रमण करत असता त्यांची वाढ खुंटते व ते पक्‍वफळ देत नाहीत.


म्हणून मी तुम्हांला जे लिहिले होते त्याचा अर्थ असा की, बंधू म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाड, मद्यपी, किंवा वित्त हरण करणारा1 असला तर तशाची संगत धरू नये; त्याच्या पंक्तीसही बसू नये.


चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्त हरण करणारे1 ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.


मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद,


‘जरी मी आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे वागलो तरी माझे कुशलच होईल’ असे तो आपल्या मनाचे समाधान करून घेईल, पण त्यामुळे सुक्याबरोबर ओलेही जळून जाईल.


कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.


देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील असे कोणतेही “कडूपणाचे मूळ” अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये, कोणी जारकर्मी होऊ नये, किंवा ज्याने एका जेवणासाठी ‘आपले ज्येष्ठपण विकले’ त्या ‘एसावासारखे’ कोणी ऐहिक बुद्धीचे होऊ नये, म्हणून ह्याकडे लक्ष द्या.


तरी रात्री चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल; त्या दिवशी आकाश मोठा नाद करत नाहीसे होईल, सृष्टितत्त्वे तप्त होऊन लयास जातील, आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील.1


म्हणून प्रियजनहो, ह्या गोष्टींची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा,


म्हणून तू कसे स्वीकारलेस व ऐकलेस ह्याची आठवण कर; ते जतन करून ठेव व पश्‍चात्ताप कर; कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईन; मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईन हे तुला मुळीच कळणार नाही.


मग अबीगईल नाबालाकडे गेली, तेव्हा त्याने आपल्या घरी राजाच्यासारखी मेजवानी केली आहे असे तिने पाहिले; त्याचे चित्त रमून गेले होते. तो फार झिंगला होता; ह्यास्तव सकाळी उजाडेपर्यंत तिने त्याला कमीजास्त काही सांगितले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan