Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 20:47 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

47 ते विधवांची घरे गिळंकृत करतात आणि ढोंगाने लांबलचक प्रार्थना करतात; त्यांना अधिक शिक्षा होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

47 ते विधवांची घरे खाऊन फस्त करतात आणि देखाव्यासाठी लांब लांब प्रार्थना करतात. या मनुष्यांना अत्यंत वाईट शिक्षा होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

47 ते विधवांची घरे गिळंकृत करतात. लोकांना दाखवण्याच्या उद्देशाने लांबलचक प्रार्थना करतात. त्यांना अधिक शिक्षा होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

47 ते देखाव्यासाठी लांबलचक प्रार्थना करतात आणि विधवांची घरे लुबाडतात. अशा लोकांना अधिक शिक्षा होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 20:47
23 Iomraidhean Croise  

ते दाद मागणार्‍या दुबळ्यांना धुडकावून लावतात व माझ्या प्रजेतल्या गरिबांचे हक्क बुडवतात; ते विधवांना लुटतात व पोरक्यांना नागवतात.


तुझ्या ठायी लोक आईबापांना तुच्छ मानतात, तुझ्या ठायी ते परदेशीयांवर जुलूम करतात, तुझ्या ठायी ते अनाथ व विधवा ह्यांना जाचतात.


लोक येतात तसे ते तुझ्याकडे येऊन माझ्या लोकांच्या रीतीप्रमाणे तुझ्यापुढे बसतात, ते तुझी वचने ऐकतात पण त्याप्रमाणे चालत नाहीत; ते तोंडाने गोडगोड गोष्टी बोलतात, पण त्यांचे मन लोभवश झाले आहे.


ते गरिबांची मस्तके धुळीत लोळवतात, ते दीनांच्या मार्गात आडवे येतात, माझ्या पवित्र नामास बट्टा लावण्याकरता मुलगा व बाप एकाच तरुणीकडे जातात.


ते शेतांचा लोभ धरून ती हरण करतात, घरांचा लोभ धरून ती हस्तगत करतात; असे ते माणसावर व त्याच्या घरावर, माणसावर व त्याच्या वतनावर बलात्कार करतात.


तरीपण अलीकडे माझे लोक शत्रूसारखे उठले; जे युद्धप्रिय नसून सहजगत्या जवळून जातात, त्यांच्या वस्त्रांवरून घातलेला झगा तुम्ही हिसकावून घेता.


तुम्ही बर्‍याचा द्वेष करता व वाइटाची आवड धरता; तुम्ही लोकांचे कातडे सोलून काढता व त्यांच्या हाडांवरच्या मांसाचे लचके तोडता;


अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता; तुम्ही स्वतःही आत जात नाही व आत जाणार्‍यांनाही आत जाऊ देत नाही.


[अहो शास्त्र्यांनो व परूश्यांनो, ढोंग्यानो! तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकता व ढोंगाने लांबलांब प्रार्थना करता; ह्यामुळे तुम्हांला अधिक शिक्षा होईल.]


ते विधवांची घरे खाऊन टाकतात व ढोंगाने लांबलांब प्रार्थना करतात; त्यांना अधिकच शिक्षा होईल.”


इतक्यात हजारो लोकांची इतकी गर्दी झाली की ते एकमेकांना तुडवू लागले; तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांना सांगू लागला, “तुम्ही आपणांस परूश्यांच्या खमिराविषयी म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी सांभाळा.


“शास्त्र्यांसंबंधाने सावध असा; त्यांना लांबलांब झगे घालून मिरवण्यास हवे असते; बाजारांत नमस्कार, सभास्थानांत मुख्य आसने व मेजवान्यांत मुख्य मुख्य जागा त्यांना आवडतात;


मग त्याने दृष्टी वर करून धनवानांना आपली दाने मंदिराच्या भांडारात टाकताना पाहिले.


कारण आम्ही आर्जवाचे भाषण कधी करत नव्हतो, हे तुम्हांला माहीत आहे; तसेच लोभाने कपटवेष धारण करत नव्हतो, देव साक्षी आहे;


आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवतात; परंतु कृतींनी त्याला नाकारतात. ते अमंगळ, आज्ञाभंजक व प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत.


माझ्या बंधूंनो, तुम्ही पुष्कळ जण शिक्षक होऊ नका; कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हांला माहीत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan