Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 2:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला, प्रभूचे तेज त्यांच्याभोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 अचानक, देवाचा एक दूत त्यांच्यासमोर प्रकट झाला व प्रभूचे तेज त्यांच्याभोवती पसरले आणि ते खूप भ्याले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 त्या वेळी प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्याभोवती उजळले. त्यांना फार भीती वाटली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 इतक्यात त्यांच्यामध्ये प्रभूचा देवदूत प्रकट झाला आणि परमेश्वराचे गौरव त्यांच्याभोवती प्रकाशले आणि ते अत्यंत भयभीत झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 2:9
27 Iomraidhean Croise  

त्या मेघामुळे याजकांना सेवाचाकरी करण्यास उभे राहवेना, कारण परमेश्वराच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरून गेले.


अहरोन इस्राएलांच्या सर्व मंडळीशी बोलत असता त्यांनी रानाकडे नजर फिरवली, तेव्हा ढगात परमेश्वराचे तेज त्यांना दिसले.


आणि सकाळी तुम्ही परमेश्वराचे तेज पाहाल, कारण परमेश्वराविरुद्ध तुम्ही कुरकुर करीत आहात ती त्याने ऐकली आहे; आम्ही असे कोण की तुम्ही आमच्याविरुद्ध कुरकुर करावी?”


ते अत्यंत प्रफुल्लित होईल, आनंदाने गाऊन उत्सव करील; लबानोनाची शोभा त्याला मिळेल; कर्मेल व शारोन ह्यांचे ऐश्वर्य त्याला प्राप्त होईल; ती परमेश्वराचे वैभव आमच्या देवाचे ऐश्वर्य पाहतील.


म्हणजे परमेश्वराचे गौरव प्रकट होईल आणि सर्व मानवजाती एकत्र मिळून ते पाहील, कारण हे बोलणे परमेश्वराच्या तोंडचे आहे.”


ऊठ, प्रकाशमान हो; कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे; परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे.


मग मी उठून खोर्‍यात गेलो तेव्हा खबार नदीजवळ मी पाहिले होते तसे परमेश्वराचे तेज तेथेही माझ्यासमोर उभे होते; तेव्हा मी उपडा पडलो.


असे विचार त्याच्या मनात घोळत असता पाहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, “योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरीयेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे.


देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, “हे कृपा पावलेल्या स्त्रीये, कल्याण असो; प्रभू तुझ्याबरोबर असो.”1


त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते.


मग असे झाले की, त्याविषयी त्यांना भ्रांत पडली, तेव्हा पाहा, लखलखीत वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले.


यशयाने त्याचा गौरव पाहिला म्हणून तो असे म्हणाला आणि त्याच्याविषयी बोलला.


तेव्हा पाहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला; त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, “लवकर ऊठ.” तेव्हा त्याच्या हातांतील साखळदंड गळून पडले.


कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी सेवा करतो त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला,


परंतु रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले,


परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्व जण आरशाप्रमाणे ‘प्रभूच्या वैभवाचे’ प्रतिबिंब पाडत आहोत;2 आणि प्रभू जो आत्मा त्याच्या द्वारे, तेजस्वितेच्या परंपरेने, आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत.


कारण “अंधारातून उजेड प्रकाशित होईल” असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे.


सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे; तो1 देहाने प्रकट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रांत घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला.


आणि जे दिसले ते इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, “‘मी अति भयभीत’ व कंपित ‘झालो आहे.”’


त्यानंतर मी दुसर्‍या एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले, त्याला मोठा अधिकार होता; ‘आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली.’


‘नंतर’ मोठे पांढरे ‘राजासन’ व त्यावर ‘बसलेला’ एक जण ‘माझ्या दृष्टीस पडला;’ त्याच्या ‘तोंडापुढून पृथ्वी’ व आकाश हे ‘पळाले; त्यांकरता ठिकाण उरले नाही.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan