Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 2:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 हन्ना नावाची एक संदेष्ट्री होती, ती आशेराच्या वंशातील फनूएलाची मुलगी होती; ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्यकाल संपल्यापासून ती नवर्‍याजवळ सात वर्षे राहिली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 तेथे हन्ना नावाची एक संदेष्टी राहत होती. ती आशेर वंशातील फनूएलाची मुलगी असून ती फार वृद्ध झाली होती. ती लग्नानंतर आपल्या पतीसमवेत सात वर्षे राहिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

36 देवाचा संदेश देणारी हन्ना नावाची एक फार वयोवृद्ध स्त्री होती. ती आशेरच्या वंशातील फनुएलची मुलगी होती. ती सात वर्षे वैवाहिक जीवन जगली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 त्यावेळी हन्ना एक संदेष्टी होती, ती आशेर वंशातील फनूएलाची कन्या असून फार वयोवृद्ध होती. विवाहानंतर सात वर्षे ती तिच्या पतीबरोबर राहिली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 2:36
18 Iomraidhean Croise  

तेव्हा लेआ म्हणाली, “मी मोठी धन्य आहे ! इतर स्त्रिया मला धन्य म्हणतील”; म्हणून तिने त्याचे नाव ‘आशेर’ ठेवले.


तेव्हा हिल्कीया याजक, अहीकाम, अखबोर, शाफान व असाया हे हुल्दा संदेष्ट्रीकडे गेले व तिच्याशी त्यांनी भाषण केले. ती शल्लूम बिन तिकवा बिन हरहस नावाचा जामदार ह्याची स्त्री असून ती त्या वेळी यरुशलेमेच्या दुसर्‍या पेठेत राहत होती.


हंगामाच्या वेळी, धान्याची सुडी आणून ठेवतात, तसा तू पुर्‍या वयाचा होऊन कबरेत जाशील.


वृद्धपणातही ते फळ देत राहतील; ते रसभरित व टवटवीत असतील;


मग अहरोनाची बहीण मिर्याम संदेष्ट्री हिने हाती डफ घेतला आणि सर्व स्त्रिया डफ घेऊन तिच्यामागून नाचत चालल्या.


आणखी हे मानवपुत्रा, आपल्याच मनातील संदेश देणार्‍या तुझ्या लोकांच्या कन्यांकडे तोंड करून त्यांच्याविरुद्ध संदेश दे.


ह्यासाठी की, पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावेत; (आणि तुझ्या स्वतःच्याही जिवातून तलवार भोसकून जाईल.)”


तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरुशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांना ती त्याच्याविषयी सांगू लागली.


आणखी त्या दिवसांत मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन;’ म्हणजे ते संदेश देतील;


त्याला चार अविवाहित मुली होत्या. त्या ईश्वरी संदेश देत असत.


तसेच जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान करते; कारण ती मुंडण केलेल्या स्त्रीसारखीच होते.


बंधुजनहो, तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही.


अध्यक्ष अदूष्य, एका स्त्रीचा पती, नेमस्त, स्वस्थचित्त, सभ्य, अतिथिप्रिय, निपुण शिक्षक असा असावा.


जी साठ वर्षांच्या आत नसून एकाच पतीची स्त्री झाली असेल,


पाचवी चिठ्ठी आशेराच्या वंशजांची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली.


आशेर वंशापैकी बारा हजारांवर; नफताली वंशापैकी बारा हजारांवर; मनश्शे वंशापैकी बारा हजारांवर;


त्या वेळेस लप्पिदोथाची बायको दबोरा संदेष्ट्री ही इस्राएलाचा न्यायनिवाडा करत असे.


त्याला दोन बायका होत्या; एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना. पनिन्नेला मुलेबाळे झाली होती, पण हन्नेला काही अपत्य नव्हते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan