Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 19:44 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

44 तुला व ‘तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील’ आणि तुझ्यामध्ये चिर्‍यावर चिरा राहू देणार नाहीत; कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

44 ते तुला, तुझ्या मुलांना तुझ्या भिंतीच्या आत धुळीस मिळवतील व दगडावर दगड राहू देणार नाही कारण तू देवाचा तुझ्याकडे येण्याचा समय तू ओळखला नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

44 तुला व तुझ्या लोकांना धुळीस मिळवतील. तुझ्यामध्ये दगडावर दगड राहू देणार नाहीत कारण तुझ्यावर कृपादृष्टी वळवल्याचा समय तू ओळखला नाहीस.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

44 ते तुला जमीनदोस्त करून टाकतील, तुला आणि तुझ्या मुलांना भिंतींमध्ये गाडतील. ते एका दगडावर दुसरा दगड राहू देणार नाहीत, कारण परमेश्वराची तुझ्याकडे येण्याची वेळ तू ओळखली नाहीस.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 19:44
19 Iomraidhean Croise  

जो तुझी बाळके धरून खडकावर आपटील तो धन्य!


पारिपत्याच्या दिवशी व दुरून नाशकारक वादळ येईल तेव्हा काय कराल? तुम्ही साहाय्यार्थ कोणाकडे धाव घ्याल? आपले ऐश्वर्य कोठे ठेवून जाल?


मी तुझ्याभोवती वेढा घालीन व तुझी नाकेबंदी करून तुझ्यावर मोर्चे रचीन.


त्यांतला कोणी शेष उरणार नाही, कारण अनाथोथ-करांवर मी अरिष्ट, त्यांची खबर घेण्याचा वर्षकाळ आणतो.”


यरुशलेमेने घोर पातक केले आहे; म्हणून ती किळसवाणी झाली आहे; जे तिचा आदर करीत ते सर्व तिला तुच्छ मानत आहेत, कारण त्यांनी तिची नग्नता पाहिली आहे; ती उसासे टाकते, तिने पाठ फिरवली आहे.


आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकांचा अंत करावा, अधर्माबद्दल प्रायश्‍चित्त करावे, सनातन नीतिमत्ता उदयास आणावी, दृष्टान्त व संदेश मुद्रित करावेत आणि जो परमपवित्र त्याला अभिषेक करावा, हे घडून येण्यासाठी तुझे लोक व तुझे पवित्र नगर ह्यासंबंधाने सत्तर सप्तके ठरली आहेत.


बासष्ट सप्तके संपल्यावर अभिषिक्ताचा वध होईल, व त्याला काही उरणार नाही; आणि जो अधिपती येईल त्याचे लोक नगर व पवित्रस्थान उद्ध्वस्त करतील; त्याचा अंत पुराने होईल; युद्ध अंतापर्यंत चालेल; सर्वकाही उजाड होण्याचे ठरले आहे.


म्हणून तुमच्यामुळे सीयोन शेताप्रमाणे नांगरतील, यरुशलेम नासधुशीचा ढीग होईल व मंदिराचा पर्वत जंगलाने भरलेला उंचवटा होईल.


तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “हे सर्व तुम्हांला दिसते ना? मी तुम्हांला खचीत सांगतो, येथे चिर्‍यावर असा एकही चिरा राहणार नाही की जो पाडला जाणार नाही.”


येशू त्याला म्हणाला, “ह्या मोठ्या इमारती तू पाहतोस ना? जमीनदोस्त केला जाणार नाही असा चिर्‍यावर चिरा येथे राहणार नाही.”


“इस्राएलाचा देव प्रभू धन्यवादित असो, कारण त्याने ‘आपल्या लोकांची’ भेट घेऊन त्यांची ‘खंडणी भरून सुटका’ केली आहे;


आपल्या देवाच्या परम दयेने हे झाले आहे; तिच्या योगे उदयप्रकाश वरून आमच्याकडे येईल.


“जर तू, निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते! परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत.


“असे दिवस येतील की, जे तुम्ही पाहत आहात त्यांतला पाडला जाणार नाही असा चिर्‍यावर चिरा राहणार नाही.”


परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हांला दुष्कर्मी समजून तुमच्याविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून ‘समाचाराच्या दिवशी’ देवाचा गौरव करावा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan