Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 18:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 आणि मग जे देवाचे निवडलेले लोक दिवसरात्र त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? तो त्यांना मदत करण्यास वेळ लावेल का?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 तर मग देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तर परमेश्वराचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्यांना विनवण्या करतात, त्या लोकांना ते न्याय देणार नाहीत काय? ते त्यांच्यासंबंधी उशीर करतील काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 18:7
31 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, माझ्या उद्धारक देवा, मी रात्रंदिवस तुझ्यापुढे आरोळी करतो;


तोच जगाचा यथार्थ न्याय करील; तो लोकांना खरा न्याय देईल.


तुम्ही त्यांना कोणत्याही प्रकारे गांजले आणि त्यांनी माझ्याकडे गार्‍हाणे केले, तर मी त्यांचे गार्‍हाणे अवश्य ऐकेन;


हे याकोबा, असे का म्हणतोस, हे इस्राएला, असे का बोलतोस की, “माझा मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहे व माझा न्याय देवाच्या दृष्टिआड झाला आहे?”


कारण हा दृष्टान्त नेमलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करत आहे, तो फसवायचा नाही; त्याला विलंब लागला, तरी त्याची वाट पाहा; तो येईलच, त्याला विलंब लागायचा नाही.


आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता; परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील.


कारण खोटे ख्रिस्त व ‘खोटे संदेष्टे’ उठतील व साधेल तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून मोठी ‘चिन्हे व अद्भुते दाखवतील.’


मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हांला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषेकरून चांगल्या देणग्या देईल?


तुम्ही वाईट असताही तुम्हांला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?”


आता ती चौर्‍याऐंशी वर्षांची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत असे.


ह्या गोष्टींना आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा; कारण तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे.”


देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणारा आहे.


तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा;


आम्ही रात्रंदिवस पुष्कळ प्रार्थना करतो की, आम्ही तुम्हांला तोंडोतोंड पाहावे आणि तुमच्या विश्वासातील न्यूनता पूर्ण करावी.


तुमच्यावर संकट आणणार्‍या लोकांची परत संकटाने फेड करणे आणि संकट सोसणार्‍या तुम्हांला आमच्याबरोबर विश्रांती देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे,


जी खरोखरीची विधवा आहे म्हणजे एकटी पडलेली आहे, तिने आपली आशा देवावर ठेवली आहे, आणि ती रात्रंदिवस विनवण्या व प्रार्थना करत राहते;


मी आपल्या प्रार्थनांत रात्रंदिवस तुझे स्मरण अखंड करतो आणि तुझे अश्रू मनात आणून तुझ्या भेटीने मी आनंदभरित व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळगतो; तुझ्यामध्ये असलेल्या निष्कपट विश्वासाची मला आठवण होऊन, ज्या देवाची माझ्या पूर्वजांपासून चालत आलेली सेवा मी शुद्ध विवेकभावाने करतो, त्याचे मी आभार मानतो.


ह्यामुळे निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशूमधील तारण युगानुयुगाच्या गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता सर्वकाही धीराने सोसतो.


विश्वासाच्या सहभागितेतील माझे खरेखुरे लेकरू तीत ह्याला :


पंत, गलतिया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया ह्यांत पांगलेल्या (यहूदी) लोकांतील,


कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चात्ताप करावा अशी आहे.


‘हे स्वर्गा’, आणि अहो पवित्र प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो, तिच्याविषयी ‘आनंद करा;’ कारण देवाने तिला दंड करून तुम्हांला ‘न्याय दिला आहे.”’


ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस. तू ‘कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार’ नाहीस आणि पृथ्वीवर राहणार्‍या लोकांपासून आमच्या ‘रक्ताचा सूड घेणार’ नाहीस?”


ह्यामुळे ते देवाच्या राजासनासमोर आहेत; ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतात आणि ‘राजासनावर बसलेला’ त्यांच्यावर आपला मंडप विस्तृत करील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan