Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 17:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तुम्ही स्वत: सांभाळा. तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव आणि त्याने पश्‍चात्ताप केला तर त्याला क्षमा कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 स्वतःकडे लक्ष द्या! जर तुमचा भाऊ पाप करतो तर त्यास धमकावा आणि जर तो पश्चात्ताप करतो तर त्यास माफ करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 तू स्वतःला सांभाळ. तुझ्या भावाने अपराध केला, तर त्याचा दोष त्याला दाखवून त्याची कानउघाडणी कर आणि त्याने पश्चात्ताप केला तर त्याला क्षमा कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 म्हणूनच तुम्ही स्वतःला सांभाळा. “तुझ्या भावाने किंवा बहिणीने पाप केले, तर त्यांचा निषेध कर आणि त्यांनी पश्चात्ताप केला, तर त्यांना क्षमा कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 17:3
18 Iomraidhean Croise  

नीतिमान मला ताडन करो. तो मला बोल लावो, तरी ती दयाच होईल. तरी ते उत्कृष्ट तेल माझे मस्तक नको म्हणणार नाही; कारण दुर्जनांनी दुष्टाई केली तरी मी प्रार्थना करीत राहीन.


तू सावध राहा, नाहीतर तू जात आहेस त्या देशातल्या रहिवाशांशी करारमदार करशील आणि तो तुला पाश होईल.


वाग्दंड समंजसाच्या मनावर ठसतो, तसे शंभर फटके मूर्खाच्या मनावर ठसत नाहीत.


झाकलेल्या प्रेमापेक्षा, उघड शब्दताडन बरे.


निंदकाला बोल लावू नकोस, लावशील तर तो तुझा द्वेष करील; ज्ञान्याला बोल लाव म्हणजे तू त्याला अधिक प्रिय होशील.


आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नकोस; आपल्या शेजार्‍याची अवश्य कानउघाडणी कर, नाहीतर त्याच्यामुळे तुला पाप लागेल.


तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, “प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? सात वेळा काय?”


तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुमच्यावर ‘पाशाप्रमाणे’ अकस्मात येईल;


म्हणून अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला.


म्हणून तुम्ही अतिशय सावधगिरी बाळगा, कारण परमेश्वराने तुमच्याशी होरेब पर्वतावर अग्नीतून भाषण केले त्या दिवशी तुम्ही काही आकृती पाहिली नाही,


तुम्ही स्वत:विषयी सावधगिरी बाळगा; नाहीतर तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्याशी केलेला करार विसरून तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला मनाई केलेल्या एखाद्या वस्तूच्या आकाराची कोरीव मूर्ती कराल.


मात्र स्वतःविषयी सावधगिरी बाळग आणि स्वत:ला फार जप, नाहीतर तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जातील; तू आपल्या पुत्रपौत्रांना त्यांची माहिती द्यावी;


देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील असे कोणतेही “कडूपणाचे मूळ” अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये, कोणी जारकर्मी होऊ नये, किंवा ज्याने एका जेवणासाठी ‘आपले ज्येष्ठपण विकले’ त्या ‘एसावासारखे’ कोणी ऐहिक बुद्धीचे होऊ नये, म्हणून ह्याकडे लक्ष द्या.


माझ्या बंधूनो, तुमच्यामधील कोणी सत्यापासून बहकला आणि त्याला कोणी माघारी फिरवले,


आम्ही केलेले कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका, तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हांला मिळावे म्हणून खबरदारी घ्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan