Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 17:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मग त्याने शिष्यांना म्हटले, “अडखळणे येऊ नयेत हे अशक्य आहे; परंतु ज्याच्यामुळे ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार!

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “ज्यामुळे लोक पाप करतील त्या येतीलच पण ज्याच्यामुळे ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 येशूने शिष्यांना म्हटले, “लोकांना पापाला प्रवृत्त करण्याऱ्या गोष्टी घडणार, पण ज्याच्यामुळे त्या घडतात त्याला केवढे क्लेश होणार!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “लोकांना अडखळण होतील अशा गोष्टी निश्चितच येतीलच, परंतु ज्याच्याद्वारे अडखळण येईल, त्याचा धिक्कार असो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 17:1
14 Iomraidhean Croise  

परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा! तू मला अडखळण आहेस; कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे.”


अडखळणांमुळे जगाची केवढी दुर्दशा होणार! अडखळणे तर अवश्य होणार; परंतु ज्या माणसाकडून अडखळण होईल त्याची केवढी दुर्दशा होणार!


तेव्हा त्याने त्याला म्हटले, ‘ते मोशेचे व संदेष्ट्यांचे ऐकत नसतील तर मेलेल्यांमधूनही कोणी उठला तरी त्यांची खातरी होणार नाही.”’


ह्याकरता आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये; तर असे ठरवून टाकावे की, कोणी आपल्या भावापुढे ठेच लागण्यासारखे काही किंवा अडखळण ठेवू नये.


आता बंधुजनहो, मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हांला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे फुटी व अडथळे घडवून आणत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर व्हा.


यहूदी, हेल्लेणी व देवाची मंडळी ह्यांच्यापैकी कोणालाही अडखळवणारे होऊ नका;


कारण तुमच्यामध्ये जे पसंतीस1 उतरलेले आहेत ते प्रकट व्हावेत म्हणून तुमच्यामध्ये पक्षभेद असलेच पाहिजेत.


म्हणून अन्नामुळे माझ्या बंधूला अडखळण होत असेल तर मी आपल्या बंधूला अडखळवू नये म्हणून मी मांस कधीच खाणार नाही.


आत्मा स्पष्ट म्हणतो की, पुढील काळात विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील;


तथापि तुला थोड्या गोष्टींविषयी दोष देणे मला प्राप्त आहे; त्या ह्या की, ‘बलामाच्या’ शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत; त्याने ‘मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाणे व जारकर्म करणे,’ हे अडखळण ‘इस्राएलाच्या संतानांपुढे’ ठेवण्यास बालाकाला शिकवले.


तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. कारण ईजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेष्ट्री म्हणवते, आणि ‘जारकर्म करण्यास व मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाण्यास’ माझ्या दासांना शिकवून भुलवते, तिला तू तसे करू देतोस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan