Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 16:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 अन्यायी कारभार्‍याने शहाणपण केले. ह्यावरून धन्याने त्याची वाहवा केली; कारण ह्या युगाचे लोक आपल्या-सारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 अन्यायी कारभाऱ्याने शहाणपण केले. यावरुन धन्याने त्याची वाहवा केली; कारण या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 अप्रामाणिक व्यवस्थापकाने चतुराई दाखवली. ह्यावरून धन्याने त्याची वाहवा केली; कारण ह्या युगाचे लोक त्यांच्या पिढीतल्या लोकांबरोबर व्यवहारात प्रकाशाच्या लोकांपेक्षा अधिक चतुर असतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 “त्या लबाड कारभार्‍याची ही धूर्तता पाहून धन्याने त्याची वाहवा केली. या जगाचे लोक त्यांच्यासारख्यांशी व्यवहार करताना फार धूर्ततेने वागतात. प्रकाशाच्या लोकांना मात्र तसे वागता येत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 16:8
23 Iomraidhean Croise  

परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरांत सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, “तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हांला सांगितले हे खरे काय?”


अम्नोनाचा योनादाब नावाचा एक मित्र होता, तो दाविदाचा भाऊ शिमा ह्याचा पुत्र; तो मोठा चतुर होता.


तर आता बआलमूर्तीचे सर्व संदेष्टे, सर्व उपासक आणि सर्व याजक ह्यांना माझ्याकडे बोलावून आणा, त्यांच्यातला कोणीही मागे राहू देऊ नका; बआलाप्रीत्यर्थ मला महायज्ञ करायचा आहे. जो कोणी मागे राहील त्याला देहान्त शिक्षा होईल.” बआलमूर्तीच्या सर्व उपासकांचा संहार करावा म्हणून येहूने ही कपटयुक्ती योजली.


हे परमेश्वरा, आपले वतन इहलोकीच आहे असे ज्यांना वाटते, ज्यांचे पोट तू आपल्या भांडारातून भरतोस, अशा मानवांपासून ऐहिक मानवांपासून, आपल्या हाताने माझा जीव सोडव; ते आपल्या संततीतच तृप्त असोत, आणि आपण साठवलेले धन आपल्या मुलाबाळांसाठी मागे ठेवोत;


तर चला, आपण त्यांच्याशी धूर्तपणाने वागू या; नाहीतर ते संख्येने फार वाढतील आणि एखादा युद्धाचा प्रसंग आला म्हणजे ते आपल्या शत्रूंना सामील होऊन आपल्याशी कदाचित लढतील व ह्या देशातून निघून जातील.”


मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेप्रमाणे होते, पण ज्याचे हृदय कुटिल असते त्याचा तिरस्कार होतो.


मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल तर त्याची त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही; ह्या युगात नाही व येणार्‍या युगातही नाही.


“परक्यांपासून,” असे त्याने म्हटल्यावर येशू त्याला म्हणाला, “तर मुले मोकळी आहेत.


जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळांविषयीही विश्वासू आहे; आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयीही अन्यायी आहे.


तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला आपल्या घरात घ्यावे म्हणून मी काय करावे हे आता मला सुचले.’


नंतर दुसर्‍याला म्हटले, ‘तुला किती देणे आहे?’ तो म्हणाला, ‘शंभर खंड्या गहू.’ तो त्याला म्हणाला, ‘हा तुझा रोखा घे व ऐंशी मांड.’


तेव्हा प्रभूने म्हटले, “अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका.


येशूने त्यांना म्हटले, “ह्या युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न करून देतात;


परंतु ते युग व मेलेल्यांतून पुनरुत्थान हे प्राप्त करून घेण्यास जे योग्य ठरतील ते लग्न करून घेणार नाहीत व लग्न करून देणारही नाहीत;


तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुमच्याजवळ प्रकाश असतानाच प्रकाशावर विश्वास ठेवा.” येशू ह्या गोष्टी बोलला आणि तेथून निघून जाऊन त्यांच्यापासून गुप्त राहिला.


कोणी स्वत:ला फसवून घेऊ नये; ह्या युगाच्या दृष्टीने आपण ज्ञानी आहोत असे जर तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल तर त्याने ज्ञानी होण्याकरता मूर्ख व्हावे.


कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात; प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला;


नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे; त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींत असते.


कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात; आपण रात्रीचे व अंधाराचे नाही.


पण तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे ‘स्वत:चे लोक’ असे आहात; ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.’


ह्यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan