Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 16:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 तो अधोलोकात यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहाम व त्याच्या उराशी बसलेला लाजर ह्यांना दुरून पाहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 श्रीमंत मनुष्य मृतलोकात यातना भोगीत होता, तेथून त्याने वर पाहीले व दूरवर असलेल्या अब्राहामाला आणि लाजराला त्याच्या बाजूला पाहिले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 तो अधोलोकात यातना भोगत असताना, त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहाम व त्याच्या उराशी असलेला लाजर ह्यांना दुरून पाहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 आणि त्याचा आत्मा अधोलोकात गेला. तिथे तो यातना भोगीत असताना, तिथून त्याने दूर अंतरावर लाजराला अब्राहामाच्या जवळ असलेले पाहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 16:23
26 Iomraidhean Croise  

कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस; तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस;


परंतु देव माझा जीव अधोलोकाच्या कबजातून सोडवील; कारण तो मला आपणाजवळ घेईल. (सेला)


कारण माझ्यावर तुझी दया फार आहे; अधोलोकाच्या तळापासून तू माझा जीव उद्धरला आहेस.


देवाला विसरणारी सर्व राष्ट्रे म्हणजे दुर्जन अधोलोकात परत जातील.


सुज्ञ इसमाने खाली अधोलोकास जाऊ नये म्हणून त्याचा जीवनमार्ग वर जातो.


तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात; तिची पावले अधोलोकास लागतात;


तिचे घर म्हटले म्हणजे अधोलोकाकडे, मृत्यूच्या खोल्यांकडे, खाली उतरण्याचा मार्ग होय.


पण तेथे मेलेले आहेत, तिचे आमंत्रित अधोलोकाच्या खोल स्थानी आहेत, हे त्याला समजत नाही. सात्त्विक आणि दुष्ट ह्यांची तुलना शलमोनाची नीतिसूत्रे.


त्या तुला अधोलोकात, गर्तेच्या अधोभागात टाकले आहे.


खाली अधोलोकात तुझ्या स्वागतार्थ गडबड उडाली आहे; तो तुझ्यासाठी पृथ्वीवरील मरून गेलेल्या सर्व प्रमुखांना जागृत करीत आहे; राष्ट्रांच्या सर्व राजांना त्यांच्या-त्यांच्या सिंहासनावरून उठवत आहे.


हे कफर्णहूमा, ‘तू आकाशापर्यंत उंचावलेला होशील काय? तू अधोलोकापर्यंत उतरशील;’ कारण तुझ्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सदोमात घडली असती तर ते आजपर्यंत राहिले असते.


तुझा डोळा तुला अडखळवत असेल तर तो उपटून फेकून दे; दोन डोळे असून अग्निनरकात पडावे ह्यापेक्षा एक डोळा असून जीवनात जावे हे तुला बरे आहे.


अहो सापांनो, सापांच्या पिलांनो, तुम्ही नरकदंड कसा चुकवाल?


मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर [उगाच] रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, ‘अरे वेडगळा,’ असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल आणि जो कोणी त्याला ‘अरे मूर्खा,’ असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल.


तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे.


तेव्हा पाहा, ते ओरडून म्हणाले, “हे येशू, देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हांला पिडण्यास येथे आला आहेस काय?”


तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, ‘हे बापा अब्राहामा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव, ह्यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी; कारण ह्या जाळात मी क्लेश भोगत आहे.’


कारण मला पाच भाऊ आहेत; त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यांना इकडची साक्ष द्यावी.’


तो येशूला पाहून ओरडला व त्याच्यापुढे पडून मोठ्याने म्हणाला, “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, ‘तू मध्ये का पडतोस?’ मी तुला विनंती करतो, मला पीडा देऊ नकोस.”


“अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे?”


कारण ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही; तर त्यांना नरकात2 टाकले आणि न्यायनिवाड्याकरता अंधकारमय खाड्यात3 राखून ठेवले;


त्यांना ठकवणार्‍या सैतानाला ‘अग्नीच्या’ व ‘गंधकाच्या’ सरोवरात टाकण्यात आले; त्यात ते श्वापद व खोटा संदेष्टा आहे; तेथे त्यांना रात्रंदिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan