Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 16:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 कोणीएक श्रीमंत मनुष्य होता; तो जांभळी व तलम वस्त्रे घालत असे, आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करत असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 कोणीएक श्रीमंत मनुष्य होता तो जांभळे आणि महागडे खादीचे कपडे घालीत असे. प्रत्येक दिवस तो ऐशोआरामात घालवीत असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 एक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळी व तलम वस्त्रे घालून, दररोज थाटामाटाने चैन करत असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 येशू म्हणाले, “कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. तो दररोज जांभळी आणि सुंदर वस्त्रे परिधान करीत असे आणि चैनीत राहत असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 16:19
23 Iomraidhean Croise  

मग मर्दखय निळ्या, पांढर्‍या रंगाची राजकीय वस्त्रे लेवून, डोक्यांवर सोन्याचा मुकुट ठेवून व तलम सणाचा व जांभळ्या रंगाचा झगा घालून राजासमोरून निघाला; तेव्हा शूशन नगराचे लोक आनंदाने जयघोष करू लागले.


सुज्ञांचे धन त्यांचा मुकुट आहे; मूर्खांची मूर्खता केवळ मूर्खताच राहते.


ती आपणासाठी वेलबुट्टीदार पलंगपोस करते, तिचे वस्त्र तलम तागाचे व जांभळे आहे.


आरसे, मलमलीची वस्त्रे, दुपट्टे व ओढण्या ह्यांची शोभा नाहीशी करील.


तू सोन्यारुप्याने नटलीस; तुझा पेहराव उत्तम ताग, रेशीम व जरतारी ह्यांचा होता; तुला भोजनास सपीठ, मध व तेल हे असत; तू अति सुंदर होतीस व तू राजवैभवाला पोहचली होतीस.


पाहा, तुझी बहीण सदोम हिचे पाप येणेप्रमाणे होते : गर्व, अन्नाची विपुलता व ऐषआराम ही तिला व तिच्या कन्यांना होती; दरिद्री व गरजवंत ह्यांना तिने हात दिला नाही.


तुझे शीड मिसर देशाहून आणलेल्या वेलबुट्टीदार उत्तम तागाचे होते, तुला ते निशाणादाखल होते; तुझे छत एलीशा बेटातील निळ्या व जांभळ्या रंगांच्या कापडाचे होते.


नंतर त्यांनी त्याच्या अंगावर जांभळे वस्त्र चढवले आणि काट्यांचा मुकुट गुंफून त्याला घातला.


अशी त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगावरून जांभळे वस्त्र काढून त्याचे स्वतःचे कपडे त्याला पुन्हा घातले, आणि वधस्तंभावर खिळण्याकरता ते त्याला बाहेर घेऊन गेले.


मग फार दिवस झाले नाहीत तोच धाकटा मुलगा सर्वकाही जमा करून दूर देशी निघून गेला; आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली.


मग त्याने शिष्यांनाही म्हटले, “एक श्रीमंत मनुष्य होता व त्याचा एक कारभारी होता; त्याच्यावर, हा तुमची संपत्ती उडवतो, असा त्याच्याजवळ आरोप करण्यात आला.


जो कोणी आपली बायको टाकून दुसरीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो; आणि नवर्‍याने टाकलेल्या बायकोबरोबर जो लग्न करतो तो व्यभिचार करतो.


त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता;


ती स्त्री जांभळी व किरमिजी वस्त्रे ल्याली होती; आणि सोने, मूल्यवान रत्ने व मोती ह्यांनी शृंगारलेली होती. तिच्या हातात अमंगळ पदार्थांनी आणि तिच्या जारकर्माच्या मळाने भरलेला ‘सोन्याचा प्याला’ होता;


आणि म्हणतील, “अरेरे! पाहा, ही मोठी नगरी! तागाची बारीक वस्त्रे, जांभळी व किरमिजी वस्त्रे पांघरलेली, सोने, मोलवान रत्ने व मोती ह्यांनी शृंगारलेली नगरी!


ज्या मानाने तिने आपला गौरव केला व विषयभोग घेतला, त्या मानाने तिला पीडा व दुःख द्या; कारण ती ‘आपल्या मनात म्हणते, मी राणी होऊन बसले आहे; मी काही विधवा नाही; मी दुःख पाहणारच नाही.’


त्याने मागून घेतलेल्या सोन्याच्या कुंडलांचे वजन सोन्याचे एक हजार सातशे शेकेल भरले. ह्यांखेरीज चंद्रकोरी, लोलक, मिद्यानी राजांच्या अंगावरली जांभळी वस्त्रे व त्यांच्या उंटांच्या गळ्यांतील साखळ्या वेगळ्याच होत्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan